सोलापूर : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी सामाजिक अन्यायाविरुद्ध लढा देत, साहित्याच्या आणि लोकशाहीरीच्या माध्यमातून शोषित आणि वंचितांच्या हक्कांसाठी आवाज उठवला. तळागाळातील लोकांना जगण्याची दिशा त्यांच्यामुळे मिळाली.
त्यांच्या कार्याचा आदर आणि स्मरण सदैव आपल्या हृदयात जागृत राहील. त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी जिल्हाध्यक्ष संतोष पवार,कार्याध्यक्ष जुबेर बागवान, जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले, माजी परिवहन सभापती आनंद मुस्तारे,महिला अध्यक्ष संगीता जोगदनकर, युवती अध्यक्ष किरण माशाळकर,सेवादल अध्यक्ष प्रकाश जाधव ,अल्पसंख्यांक अध्यक्ष अमीर शेख,वैद्यकीय मदत कक्ष बसवराज कोळी, अल्पसंख्यांक कार्याध्यक्ष संजय मोरे, मध्य विधानसभा अध्यक्ष अलमेहराज आबादिराजे, कार्याध्यक्ष विकास हिरेमठ, सामाजिक न्याय विभाग अध्यक्ष अनिल बनसोडे, कार्याध्यक्ष शत्रुघ्न कांबळे, सेक्रेटरी दत्ता बनसोडे, दक्षिण विधानसभा कार्याध्यक्ष प्रदीप भालशंकर, सोशल मिडीया कार्याध्यक्ष सोमनाथ शिंदे, उत्तर विधानसभा अध्यक्ष अमोल कोटीवाले, कार्याध्यक्ष मनोज शेरला, निशांत तारानाईक आदीं पदाधिकारी उपस्थित होते .