• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Sunday, June 1, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

कोरोना चाचण्यांचे दर पाचशे ते सातशे रूपयाने स्वस्त राज्य शासनाचा निर्णय

by Yes News Marathi
September 8, 2020
in मुख्य बातमी
0
कोरोना चाचण्यांचे दर पाचशे ते सातशे रूपयाने स्वस्त राज्य शासनाचा निर्णय
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर, दि.8: राज्यातील कोरोनाग्रस्तांना शासनाने दिलासा दिला असून कोरोना चाचणीसाठी एनएबीएल आणि भारतीय आयुर्विज्ञान संस्थेने (आयसीएमआर) मान्यता दिलेल्या खासगी प्रयोगशाळेत चाचण्यांचे दर आणखी कमी केले आहेत. पूर्वीच्या दरापेक्षा हे दर पाचशे ते सातशे रूपयांनी स्वस्त झाले असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदीप ढेले यांनी सांगितले.

 

            सामान्य जनतेला परवडणारे कोरोना चाचण्यांचे दर असावेत, अशी मागणी येत असल्याने राज्य शासनाने दर निश्चित करण्यासाठी समिती स्थापन केली होती. समितीचा अहवाल शासनाला सादर झाला असून त्यानुसार कोरोना चाचण्यांचे दर आकारले जाणार आहेत. मिशन बिगीन अगेन अंतर्गत राज्यातील औद्योगिक संस्था, औषध निर्माण संस्था सुरू झाल्या आहेत. परिवहन सेवाही सुरू झाली असून चाचण्यांसाठी रिएजंटस, व्हीटीएम कीट, पीपीई कीट, एन95 मास्क, आरएनए एक्स्ट्रॅक्शन की जेम पोर्टलवर माफक दरात उपलब्ध झाले आहे. आयसीएमआरने उत्पादक कंपन्यांना मान्यता दिल्याने उपलब्धता वाढली आहे. मान्यताप्राप्त प्रयोगशाळांची संख्याही वाढली आहे.

 

            यामुळे कोरोना चाचण्यांचे सुधारित दर निश्चित करण्याचे शासनाने ठरविले आहे. कोणत्याही प्रयोगशाळेला सुधारित दरांपेक्षा अधिक दर आकारता येणार नाहीत, असा शासन निर्णय सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांच्या स्वाक्षरीने जारी करण्यात आला आहे.

 

            सुधारित आणि पूर्वीचे दर खालीलप्रमाणे

 

  • संकलन केंद्रातून नमुने घेऊन तपासणी- 1200 रूपये (पूर्वीचे-1900 रूपये)
  • दवाखाने, क्वारंटाईन सेंटरमधून नमुने घेऊन तपासणी-1600 रूपये (पूर्वीचे-2200 रूपये)
  • रूग्णांच्या घरून नमुने तपासणी-2000 रूपये (पूर्वीचे-2500 रूपये)

Previous Post

पीक कर्ज वाटपाने गाठला 80 टक्क्यांचा टप्पा

Next Post

भीमा नदीचा पात्रात तरुण वाहून गेला,भंडारकवठ्यातील दुर्दैवी घटना..

Next Post
भीमा नदीचा पात्रात तरुण वाहून गेला,भंडारकवठ्यातील दुर्दैवी घटना..

भीमा नदीचा पात्रात तरुण वाहून गेला,भंडारकवठ्यातील दुर्दैवी घटना..

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group