• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या नावातील ऊर्जेप्रमाणे विद्यापीठाची उंची वाढावी: कुलगुरू डॉ. चासकर

Yes News Marathi by Yes News Marathi
March 6, 2025
in इतर घडामोडी
0
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या नावातील ऊर्जेप्रमाणे विद्यापीठाची उंची वाढावी: कुलगुरू डॉ. चासकर
0
SHARES
0
VIEWS

सहाव्या नामविस्तार सोहळ्यानिमित्त ग्रंथदिंडी, वृक्षारोपण, राष्ट्रीय चर्चासत्र संपन्न!

सोलापूर – ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर’ या  नावातच मोठी उर्जा आहे. अशा या महान रणरागिणी व कुशल प्रशासक राहिलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी संपूर्ण भारतभर विविध मंदिरांचा जीर्णोद्धार करण्याबरोबरच विहिरी, बारवा निर्माण करत आदर्श राज्यकारभार पाहिला आहे. त्यांच्या नावाने वाटचाल सुरू ठेवलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाने अल्प कालावधीत चांगली भरारी घेतली आहे, या पुढील काळात पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या नावातील ऊर्जेप्रमाणे विद्यापीठाने मोठी उंची गाठावी, अशी अपेक्षा स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू प्रा.डॉ. मनोहर चासकर यांनी व्यक्त केल पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा सहावा नामविस्तार दिनाचा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. यानिमित्त विद्यापीठ कॅम्पसमधून ग्रंथदिंडी काढण्यात आली. यात विद्यार्थ्यांचा मोठा सहभाग होता. वृक्षारोपणही करण्यात आले. त्यानंतर मुख्य सभागृहात कुलगुरू प्रा. डॉ. प्रकाश महानवर यांच्या अध्यक्षतेखाली मुख्य कार्यक्रम व राष्ट्रीय चर्चासत्र पार पडले. याचे उद्घाटन कुलगुरू प्रा. मनोहर चासकर यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर होळकर इतिहास साधन ग्रंथाचे संपादक डॉ. देविदास पोटे, कुलसचिव योगिनी घारे यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रास्ताविकातून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर अध्यासन केंद्राचे संचालक डॉ. प्रभाकर कोळेकर यांनी अध्यासन केंद्राकडून सुरू असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली.

कुलगुरू प्रा. चासकर म्हणाले की, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठास पीएमउषा योजनेतून 100 कोटी रुपयांचा निधी मिळाला. यातून विद्यार्थ्यांसाठी चांगल्या सोयी-सुविधा निर्माण होतील. यातून विद्यापीठ नावावररूपाला येईल. विद्यार्थी केंद्रबिंदू म्हणून वाटचाल करत असताना चांगले विद्यार्थी घडवण्यासाठी अध्यापक व प्रशासनाने प्रयत्नशील राहिले पाहिजे. संशोधन केंद्रांमधून चांगले संशोधन व संशोधक निर्माण झाले पाहिजे, अशी अपेक्षा देखील त्यांनी यावेळी व्यक्त केली.

कुलगुरू प्रा. महानवर म्हणाले की, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सध्या तारुण्यावस्थेत असून शासनाकडून 100 कोटी रुपये निधी मिळाल्याने विद्यापीठाची जडणघडण निश्चितच चांगली होणार आहे. विद्यार्थ्यांच्या कल्याणासाठी प्रत्येक गोष्ट करण्यात येईल. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची आदर्श जीवनशैली, त्यांचे विचार, कार्य हेही विद्यार्थ्यांना कळण्यासाठी अध्यासन केंद्राकडून विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. अहिल्यादेवी होळकरांचे लोककल्याणासाठी कार्य खूप मोठे आहे. त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून विद्यापीठ प्रशासन कार्य करीत राहील. विद्यापीठाकडून विविध संस्था व विद्यापीठे यांच्याशी करार करण्यात येत आहे. यातून आपल्या विद्यार्थ्यांसाठी चांगले ज्ञान मिळण्याबरोबरच विद्यापीठ पुढे जाण्यासाठी मदत होईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी डॉ. देविदास पोटे यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जाज्वल्य इतिहासाची महती सांगताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या जनकल्याणाचा वसा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी पुढे चालविल्याचे सांगितले. प्रजावत्सल्य, कर्तव्य कठोर प्रशासक, लोक कल्याणकारी लोकमाता राहिलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी आदर्श राज्यकारभार पाहिल्याचे सांगितले. या कार्यक्रमात विविध स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमास व्यवस्थापन परिषद सदस्य प्रा. देवानंद चिलवंत, प्रा. सचिन गायकवाड, स्मारक समितीचे सदस्य प्रा. सुभाष मस्के तसेच विद्यापीठाच्या विविध प्राधिकरणाचे सदस्य, प्राचार्य, शिक्षक, विद्यार्थी, कर्मचारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. ममता बोल्ली, डॉ. तेजस्विनी कांबळे, प्रा. श्रुती देवळे यांनी केले तर आभार कुलसचिव योगिनी घारे यांनी मानले.

Previous Post

जनकल्याण यात्रेद्वारे योजनांचा होणार जागर

Next Post

सोलापूरच्या विविध प्रश्नांवर आ. देवेंद्र कोठे यांनी विधानसभेत उठविला आवाज

Related Posts

सुंद्री-व्हायोलिन जुगलबंदी अन् संगीताचा आविष्कार; सोलापुरात रविवारी ‘संगीत प्रतिभा महोत्सव’
इतर घडामोडी

सुंद्री-व्हायोलिन जुगलबंदी अन् संगीताचा आविष्कार; सोलापुरात रविवारी ‘संगीत प्रतिभा महोत्सव’

August 25, 2026
जळगावच्या औद्योगिक विकासाला गती द्या; प्रलंबित प्रश्न व नवीन प्रकल्प कालबद्ध पद्धतीने पूर्ण करा – उदय सामंत
इतर घडामोडी

जळगावच्या औद्योगिक विकासाला गती द्या; प्रलंबित प्रश्न व नवीन प्रकल्प कालबद्ध पद्धतीने पूर्ण करा – उदय सामंत

August 25, 2026
वर्ध्यातील न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा देशातील आदर्श केंद्र ठरावे – डॉ. पंकज भोयर
इतर घडामोडी

वर्ध्यातील न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा देशातील आदर्श केंद्र ठरावे – डॉ. पंकज भोयर

August 25, 2026
एसआरपीएफच्या जागतिक दर्जाच्या प्रशिक्षण केंद्रासाठी सर्वंकष आराखडा तयार करा – डॉ. पंकज भोयर
इतर घडामोडी

एसआरपीएफच्या जागतिक दर्जाच्या प्रशिक्षण केंद्रासाठी सर्वंकष आराखडा तयार करा – डॉ. पंकज भोयर

August 25, 2026
‘प्रधानमंत्री यशस्वी’ शिष्यवृत्तीसाठी ३१ ऑगस्टपर्यंत अर्ज करा; मागासवर्गीय विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची संधी
इतर घडामोडी

‘प्रधानमंत्री यशस्वी’ शिष्यवृत्तीसाठी ३१ ऑगस्टपर्यंत अर्ज करा; मागासवर्गीय विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची संधी

August 25, 2026
जिल्हा परिषदेच्या शाळांचे ‘ए, बी, सी, डी’ वर्गीकरण; आठ दिवसांत सुविधांचा अहवाल द्या – जयकुमार गोरे
इतर घडामोडी

जिल्हा परिषदेच्या शाळांचे ‘ए, बी, सी, डी’ वर्गीकरण; आठ दिवसांत सुविधांचा अहवाल द्या – जयकुमार गोरे

August 25, 2026
Next Post
सोलापूरच्या विविध प्रश्नांवर आ. देवेंद्र कोठे यांनी विधानसभेत उठविला आवाज

सोलापूरच्या विविध प्रश्नांवर आ. देवेंद्र कोठे यांनी विधानसभेत उठविला आवाज

ताज्या बातम्या

ई – बसेस आल्या मात्र आणखी महिनाभराची प्रतीक्षा…!

ई – बसेस आल्या मात्र आणखी महिनाभराची प्रतीक्षा…!

August 25, 2026
सुंद्री-व्हायोलिन जुगलबंदी अन् संगीताचा आविष्कार; सोलापुरात रविवारी ‘संगीत प्रतिभा महोत्सव’

सुंद्री-व्हायोलिन जुगलबंदी अन् संगीताचा आविष्कार; सोलापुरात रविवारी ‘संगीत प्रतिभा महोत्सव’

August 25, 2026
सोलापूरच्या डॉ .संदीपान नरोटे यांची राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारासाठी निवड.

सोलापूरच्या डॉ .संदीपान नरोटे यांची राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारासाठी निवड.

August 25, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026