• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

जय शिवाजी जय भारत पदयात्रेत… ढोल ताशाच्या गजराने सोलापूर नगरी दुमदुमली…

Yes News Marathi by Yes News Marathi
February 19, 2025
in इतर घडामोडी
0
जय शिवाजी जय भारत पदयात्रेत… ढोल ताशाच्या गजराने सोलापूर नगरी दुमदुमली…
0
SHARES
1
VIEWS

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 395 व्या जयंतीनिमित्त आयोजित पदयात्रेत विद्यार्थी नागरिकांचा प्रचंड उत्साहात सहभाग

नवीन जिल्हाधिकारी कार्यालय ते रंगभवन येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज उद्यान पर्यंत जय शिवाजी जय भारत पदयात्रेचे आयोजन

सोलापूर-छत्रपती शिवाजी महाराज यांची 395 वी जयंती जयंतीनिमित्त नवीन जिल्हाधिकारी कार्यालय ते रंगभवन चौकातील श्री छत्रपती शिवाजी महाराज उद्याना पर्यंत जय शिवाजी जय भारत पदयात्रा काढण्यात आली. या पदयात्रेत सहभागी जिल्हा प्रशासनातील सर्व अधिकारी- कर्मचारी, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी, नागरिक, पालक, पत्रकार यांनी जय भवानी जय शिवाजी या घोषणा देऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वातंत्र्य, समानता आणि न्यायाचा विचारधारेला पुढे नेऊन समाजात एकता आणि राष्ट्रीय ऐक्य भावना निर्माण करण्याचा संदेश दिला.

     या पदयात्रेत जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, मुख्य कार्यकारी कुलदीप जंगम, पोलीस शहर आयुक्त एम. राजकुमार, अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंह ठाकुर, निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार, प्रादेशिक परिवहन अधिकारी गजानन नेरपगार, जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार, जिल्हा नगरपालिका प्रशासन अधिकारी विना पवार, उपजिल्हाधिकारी महसूल अमृत नाटेकर, उपजिल्हाधिकारी तथा भूसंपादन अधिकारी संतोषकुमार देशमुख, प्रांताधिकारी सदाशिव पडदुने, तहसीलदार श्रीकांत पाटील, तहसीलदार निलेश पाटील यांच्यासह अन्य सर्व संबंधित विभागाचे अधिकारी कर्मचारी व मान्यवर नागरिक उपस्थित होते. 

जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी जय शिवाजी जय भारत पदयात्रेला हिरवा झेंडा दाखवून यात्रेचा शुभारंभ केला. तसेच स्वतः या पदयात्रेत सहभागी झाले. ही यात्रा नवीन जिल्हाधिकारी कार्यालय, सात रस्ता चौक मार्गे, रंगभवन चौकातील श्री छत्रपती शिवाजी महाराज उद्यानापर्यंत आली. या ठिकाणी सोलापूर शहरातील मुस्लिम बांधवाकडून पदयात्रेचे स्वागत पुष्पगुच्छ व पुष्पवृष्टी करून करण्यात आले. 


      श्री छत्रपती शिवाजी महाराज उद्यानातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज मुस्लिम ब्रिगेड च्या वतीने महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला.

नियोजन भवन येथील कार्यक्रम
छत्रपती शिवाजी महाराज यांची 395 वी जयंतीनिमित्त दिनांक 19 फेब्रुवारी 2025 रोजी केंद्र शासनाने महाराष्ट्रातील सर्व 36 जिल्ह्यामध्ये “जय शिवाजी जय भारत” पदयात्रा राबविण्याचा निर्णय घेतलेला आहे. नियोजन भवन येथील कार्यक्रमाचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात केली.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्शांचे अनुकरण करून समाजात एकता निर्माण करूया
-जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद

      आजचा दिवस आपल्या सर्वांसाठी एक ऐतिहासिक आणि प्रेरणादायक दिवस आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा संघर्ष, त्यांचे धैर्य आणि नेतृत्व कौशल्यामुळे आपण सर्वांना एकत्र येण्याची संधी मिळाली आहे. आपण त्यांच्या आदर्शांचे अनुकरण करून समाजात एकता निर्माण करण्यासाठी प्रयत्न करूया. जय शिवाजी जय भारत या पदयात्रेच्या माध्यमातून आपण महाराजांच्या विचारधारेला उजाळा देणार आहोत. ही पदयात्रा फक्त एक भव्य उत्सव नाही तर आपल्या सांस्कृतिक वारशाचे प्रतीक असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केले.

*एक पेड मां के नाम-
केंद्र शासनाच्या सूचनेप्रमाणे या पदयात्रा उत्सवात आईच्या नावाने एक वृक्ष (एक पेड मां के नाम) यानुसार नियोजन भवन परिसरात जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या हस्ते एका वृक्षाची लागवड करण्यात आली.

*पदयात्रा-
जय शिवाजी जय भारत पद यात्रेला जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी हिरवा झेंडा दाखवून यात्रेचा शुभारंभ केला. त्यानंतर या यात्रेत सहभागी झालेल्या विद्यार्थी नागरिकांकडून जय भवानी जय शिवाजी यांच्या घोषणा तर ढोल ताशाच्या गजराने संपूर्ण परिसर दुमदुमला होता. पदयात्रेत सहभागी झालेल्या प्रत्येकाच्या अंगात विजयश्री संचारल्याप्रमाणे प्रत्येक जण घोषणा देऊन पुढे मार्गस्थ होत होता. या पदयात्रेत सहभागी विविध शाळेतील विद्यार्थ्यांनी तसेच ढोल ताशा, लेझीमच्या गजराने एका मोठ्या उत्सावाचे वातावरण तयार केले होते.

     प्रारंभी जिल्हा क्रीडा अधिकारी नरेंद्र पवार यांनी जय शिवाजी जय भारत पदयात्राच्या आयोजनाच्या उद्देश सांगितला. केंद्र शासनाच्या युवा कार्यक्रम आणि क्रीडा मंत्रालयाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची 395 जयंती महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यात पदयात्रेच्या माध्यमातून साजरी करण्याचे सुचित करण्यात आलेले होते. त्याप्रमाणे सोलापूर जिल्हा प्रशासनाने ही यात्रा आयोजित केलेली असून यात सहभागी झालेल्या सर्व शाळांमधील विद्यार्थी पालक तसेच मान्यवर व्यक्तींचे त्यांनी यावेळी स्वागत केले. तसेच क्रीडा क्षेत्रातील मान्यवर व्यक्तींचे यावेळी स्वागत करण्यात आले. तसेच काही शाळांमध्ये विद्यार्थ्यांनाही मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले.

    यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरील शौर्य गीतांचे गायन झाले. तसेच शाहीर यांनी पोवाड्याच्या माध्यमातून शिवछत्रपतींचा इतिहास सर्वांसमोर मांडला. यावेळी शिवछत्रपती यांचा पाळणा कार्यक्रम झाला. शालेय विद्यार्थ्यांच्या लेझीम पथकाचे सादरीकरण झाले. त्यांनी त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण लेझीम खेळातून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. तसेच येथे आलेल्या अनेक विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा पोशाख परिधान केलेला होता तसेच मावळे झालेले विद्यार्थी हे सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. शालेय विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचे कार्य व विचार यावर भाषण केले. प्रारंभी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दीप प्रज्वलन तसेच छत्रपती शिवाजी महाराज यच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाचा शुभारंभ केला.
Previous Post

‘छावा’ चित्रपटाने कमावले 4 दिवसात 140 कोटी …

Next Post

शिवजयंती निमित्त आस्था सामाजिक संस्थेच्या वतीने विद्यार्थ्यांना फळे व बिस्किटांचे वाटप…

Related Posts

मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळातर्फे शनिवारी बक्षीस वितरण..
इतर घडामोडी

मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळातर्फे शनिवारी बक्षीस वितरण..

August 27, 2026
नेपाळमधील पूरस्थिती; महाराष्ट्रातील नागरिकांसाठी २४ तास हेल्पलाईन सुरू
Blog

नेपाळमधील पूरस्थिती; महाराष्ट्रातील नागरिकांसाठी २४ तास हेल्पलाईन सुरू

August 27, 2026
चाकणमध्ये होणार 2 हजार 320 कोटींची गुंतवणूक; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार ..!
इतर घडामोडी

चाकणमध्ये होणार 2 हजार 320 कोटींची गुंतवणूक; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार ..!

August 27, 2026
दक्षिण सोलापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये ‘स्पोकन इंग्लिश’ उपक्रमास प्रारंभ
इतर घडामोडी

दक्षिण सोलापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये ‘स्पोकन इंग्लिश’ उपक्रमास प्रारंभ

August 26, 2026
मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांवर तातडीने कार्यवाही करा; राधाकृष्ण विखे पाटलांचे निर्देश
इतर घडामोडी

मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांवर तातडीने कार्यवाही करा; राधाकृष्ण विखे पाटलांचे निर्देश

August 26, 2026
चाकणच्या विकासाचा रोडमॅप तयार; सुनेत्रा पवारांकडून उच्चस्तरीय समितीच्या कामाचा आढावा
इतर घडामोडी

चाकणच्या विकासाचा रोडमॅप तयार; सुनेत्रा पवारांकडून उच्चस्तरीय समितीच्या कामाचा आढावा

August 26, 2026
Next Post
शिवजयंती निमित्त आस्था सामाजिक संस्थेच्या वतीने विद्यार्थ्यांना फळे व बिस्किटांचे वाटप…

शिवजयंती निमित्त आस्था सामाजिक संस्थेच्या वतीने विद्यार्थ्यांना फळे व बिस्किटांचे वाटप...

ताज्या बातम्या

बालिका अत्याचार-हत्या प्रकरणी आरोपीला कठोर शिक्षा; सुनेत्रा पवारांची ग्वाही

बालिका अत्याचार-हत्या प्रकरणी आरोपीला कठोर शिक्षा; सुनेत्रा पवारांची ग्वाही

August 27, 2026
मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळातर्फे शनिवारी बक्षीस वितरण..

मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळातर्फे शनिवारी बक्षीस वितरण..

August 27, 2026
सोलापूर ZP च्या 10 कोटी रुपयांच्या औषध खरेदीची होणार चौकशी…!

सोलापूर ZP च्या 10 कोटी रुपयांच्या औषध खरेदीची होणार चौकशी…!

August 27, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026