• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

१२ ते १८ फेब्रुवारी दरम्यान होम मैदानावर “इलेक्ट्रो २०२५” प्रदर्शन…

Yes News Marathi by Yes News Marathi
February 8, 2025
in इतर घडामोडी
0
१२ ते १८ फेब्रुवारी दरम्यान होम मैदानावर “इलेक्ट्रो २०२५” प्रदर्शन…
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर इलेक्ट्रॉनिक्स डिलर्स असोसिएशन द्वारा इलेक्ट्रॉनिक्स, काॅम्प्यूटर, टेलिकम्युनिकेशन, होम अप्लायन्सेस, सोलार सिस्टम, फिटनेस इक्विपमेंटस् चे भव्य प्रदर्शन “इलेक्ट्रो २०२५” चे आयोजन केले आहे. दि. १२ ते १८ फेब्रुवारी या कालावधीत होम मैदानावर हे प्रदर्शन आयोजित केले असल्याची माहिती सेडाचे अध्यक्ष श्री. आनंद येमुल यांनी पत्रकार परिषदेत दिली.

यंदा इलक्ट्रो प्रदर्शनाचे ‘शार्प’ कंपनी हे मुख्य प्रायोजक तर हायफा इलेक्ट्रिकल्स् व एमआयटी विश्वप्रयाग युनिव्हर्सिटी हे सहप्रायोजक असून प्रदर्शनाचे उद्घाटन मंगळवार दि. १२ फेब्रुवारी रोजी सायं. ५ वा. जिल्हाधिकारी कुमार आर्शीवाद यांच्या शुभहस्ते व वसंत जोशी, बिझनेस हेड, शार्प बिझनेस सिस्टम्स् इंडिया लि. यांच्या उपस्थितीत संपन्न होणार असल्याची माहिती इलेक्ट्रो चेअरमन दीपक मुनोत यांनी सांगितले.

सलग ७ दिवस चालणाऱ्या इलेक्ट्रो २०२५ या प्रदर्शनाचे हे २५ वे वर्ष असून सोलापूर जिल्हा महाराष्ट्र व कर्नाटक आदीच्या आसपासचे सर्व ग्राहक या प्रदर्शनाची वाट पहात असतात. दररोज दु. ४ ते रा. ९.३० व रविवारी स. ११ ते रा. ९.३० पर्यंत चालणाऱ्या या प्रदर्शनामध्ये राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कंपन्यांचा सहभाग असून एलईडी, फ्रिज, साईड बाय साईड फ्रिज, एअर कंडीशनर, म्युझिक सिस्टीम, वॉशिंग मशीन, डिश टिव्ही, मायक्रोव्हेव ओव्हन, व्हॅक्यूम क्लिनर, एअर कंडीशनर, सोलर सिस्टीम, गॅस गिझर, मोबाईल, टॅब, आय पॅड, टेलीफोन, मिक्सर, फुड प्रोसेसर, आटा चक्की, एअर कुलर, वॉटर प्युरीफायर, स्टॅबीलायझर, चिमणी हुड, कॉम्प्युटर, लॅपटॉप, प्रिंटर, ऑफिस ऑटोमेशन फिटनेस इक्विपमेंटस् इत्यादी या प्रदर्शनामध्ये उपलब्ध असतात. ग्राहकांना विविध नमुन्यात व विविध रंगात आकर्षक किंमतीत निरनिराळ्या योजनांखाली वस्तू खरेदी करता येतात. तसेच विविध फायनान्स कंपनीच्या माध्यमातून शुन्य टक्के ०% व्याज दराने कर्जाची उपलब्धता देखील केली जाते.

सेडा तर्फे आयोजित केलेल्या इलेक्ट्रो २०२४ ला स्टॉल धारकांनी प्रचंड प्रतिसाद दिला होता. यावर्षी सुमारे २६० स्टॉल्स् असणार असून सुमारे एक लाख पेक्षा जास्त ग्राहक प्रदर्शनास भेट देतील. प्रदर्शनाचे यंदाचे खास आकर्षण म्हणजे ५ वेगळे आंतरराष्ट्रीय पध्दतीचे जर्मन हँगर मध्ये प्री फॅब्रीकेटेड व कंपनी फिटेड स्टॉल्स् असणार आहेत. दुचाकी साठी होम मैदान तर चार चाकी वाहनांसाठी मैदानाच्या आसपासची जागा ग्राऊंड पार्किंगसाठी ठेवण्यात आले आहे.

या प्रदर्शनामध्ये ठिकठिकाणी ग्राहकांना बसण्याची सोय, मोफत पार्किंग तसेच शुध्द पिण्याचे पाण्याची सोय केलेली आहे. भेट देणाऱ्या ग्राहकांना दररोज लकी ड्रॉ व शेवटच्या दिवशी बंपर ड्रॉ काढण्यात येणार आहे.

सर्व स्टॉल मध्ये जवळपास ४०० विविध पदवीधर व एमबीए विद्यार्थ्यांना कंपनी कडून ट्रेनिंग देवून ग्राहकांना माहिती देण्यात येणार आहे. या प्रदर्शनाच्या संपूर्ण संयोजनासाठी सेडाद्वारे विविधसमित्या कार्यरत आहे. यंदाचे प्रदर्शन हे वैविध्यपूर्ण, नाविन्यपूर्ण आणि सुविधापूर्ण असणार आहे. धुळमुक्त प्रदर्शनासाठी संपूर्ण मैदान वर मॅटींग ची व्यवस्था करण्यात आली आहे. स्टॉलधारक आणि प्रेक्षकांसाठी विविध सोई उपलब्ध करण्यात येणार असुन यामध्ये खवय्या साठी फुड कोर्ट ची वेगळी व्यवस्था करण्यात आली आहे. दिव्यांग व्यक्तिंना देखील प्रदर्शन अनुभवता येणार असुन त्यांच्यासाठी व्हील चेअरची विशेष सोय करण्यात आली आहे. प्रेक्षक आणि स्टॉल धारक यांच्या सुरक्षिततेसाठी फायर ब्रिगेड तसेच सिक्युरिटी गार्डस ही नेमण्यात आले आहेत. सेडा तर्फे प्रदर्शन दरम्यान दररोज रक्तदान उपक्रम घेतला जाणार आहे. संपूर्ण प्रदर्शन जास्तीत जास्त कसे डिजीटल होईल यावर संपूर्ण कटाक्ष आहे. प्रर्दशनासाठी प्रशस्त मोफत पार्कीगची सोय व माहितीसाठी वेगळे काऊंटर व सहभागी स्टॉलची माहिती क्युआर कोड द्वारे सर्वांना त्यांच्या मोबाईलवरच मिळण्याची सोय यंदा करण्यात आली आहे. यंदाचे वर्षी गो ग्रीन या संकल्पनेतून पेट्रोल, डिझेल मुक्त, एमएसईबीची विद्युत सुविधा वापरण्यात येणार असल्याची माहिती इलेक्ट्रो चेअरमन दिपक मुनोत यांनी दिली.

सेडातर्फे अनेक सामाजिक उपक्रम ही राबविण्यात येत असून त्यामध्ये सेडाच्या सभासदांच्या कर्मचाऱ्यांसाठी शैक्षणिक व वैद्यकिय मदतही करण्यात येते. कर्मचारी प्रशिक्षणासह व्यवसाय वृध्दीसाठी कार्यशाळेचेही आयोजन करण्यात येतात. स्थानिक प्रशासनाकडून इलेक्ट्रो यशस्वी होण्यास मार्गदर्शन व सर्वोतपरी मदत मिळत आहे. या प्रदर्शनातही ४ स्टॉल्स् सामाजिक संस्थांना उपलब्ध करून दिले असून इच्छुक सामाजिक संस्थांनी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

या पत्रकार परीषदेस सेडाचे सचिव भुषण भुतडा, खजिनदार सुयोग कालाणी, सह सचिव हरीष कुकरेजा, उपाध्यक्ष डॉ. सूरजरतन धुत व संचालक गिरीश मुंदडा, यल्लप्पा भोसले, चंद्रकांत शाहपुरे, संदेश कोठारी, बसवराज नवले, राजेश जाजू, रवींद्र पाचलगे, गणेश सुत्रावे व संस्थेचे माजी अध्यक्ष जितेंद्र राठी, शिवप्रकाश चव्हाण, खुशाल देढीया, ईश्वर मालू, कौशिक शाह, केतन शाह, सतिश मालू, विपीन कुलकर्णी, आनंदराज दोशी, दिलीप राऊत, दिपक मुनोत, समीर गांधी सह सदस्य विजय टेके व सर्व इलेक्ट्रो समिती सदस्य उपस्थित होते.

Previous Post

२७ वर्षांनी दिल्लीत भाजपचे सरकार… ७० पैकी ४० जागांवर पुढे; आम आदमी, काँग्रेसचा पराभव

Next Post

मनोज व्हटकर यांना यंदाचा ल.गो. काकडे स्मृती पुरस्कार जाहीर

Related Posts

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत
इतर घडामोडी

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत

August 24, 2026
धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही
इतर घडामोडी

धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही

August 24, 2026
ज्येष्ठांच्या स्विमिंग स्पर्धेत शशिकांत पाटलांनी मारली बाजी
इतर घडामोडी

ज्येष्ठांच्या स्विमिंग स्पर्धेत शशिकांत पाटलांनी मारली बाजी

August 24, 2026
मार्कंडेय महामुनी रथोत्सवाच्या नियोजनासाठी महापौर कार्यालयात आढावा बैठक संपन्न
इतर घडामोडी

मार्कंडेय महामुनी रथोत्सवाच्या नियोजनासाठी महापौर कार्यालयात आढावा बैठक संपन्न

August 24, 2026
‍ जनकल्याण मल्टीस्टेटच्या सभासदांना तेरा टक्के लाभांश वाटप;हजारे
इतर घडामोडी

‍ जनकल्याण मल्टीस्टेटच्या सभासदांना तेरा टक्के लाभांश वाटप;हजारे

August 23, 2026
मंद्रूपच्या विठ्ठल मंदिरात श्रावणमास निमित्त ‘शिवसहस्त्रनामावली महायज्ञ’ ‘रुद्र स्वाहाकार’
इतर घडामोडी

मंद्रूपच्या विठ्ठल मंदिरात श्रावणमास निमित्त ‘शिवसहस्त्रनामावली महायज्ञ’ ‘रुद्र स्वाहाकार’

August 22, 2026
Next Post
मनोज व्हटकर यांना यंदाचा ल.गो. काकडे स्मृती पुरस्कार जाहीर

मनोज व्हटकर यांना यंदाचा ल.गो. काकडे स्मृती पुरस्कार जाहीर

ताज्या बातम्या

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत

August 24, 2026
अमरावतीत तीन नवजात बालकांचा होरपळून मृत्यू…राज्य सरकारकडून 5 लाख रुपये आर्थिक मदत

अमरावतीत तीन नवजात बालकांचा होरपळून मृत्यू…राज्य सरकारकडून 5 लाख रुपये आर्थिक मदत

August 24, 2026
धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही

धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही

August 24, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026