पंढरपूर : माघवारी पालखी सोहळा परंपरेने माघ शुद्ध दशमीला पायी चालत पंढरीमध्ये प्रवेश करत असताना रिंगण करण्याची प्रथा आहे.रिंगण सोहळा हा वारकरी संप्रदायातील खूप महत्वपूर्ण आहे. त्याप्रमाणे वारकरी भाविक पाऊल खेळत ” ज्ञानोबा तुकाराम ” गजर करत उत्साहमध्ये उड्या मारत भक्तीमय वातावरण मध्ये निघाला. दि. 07-02-2025 रोजी स. 10.00 वा. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी व संत तुकाराम महाराज पालखीचे पूजन ह भ प भागवत चवरे महाराज (राष्ट्रीय उपाध्यक्ष ) यांचे शुभ हस्ते करण्यात आले.
तदनंतर जलाराम महाराज मठ, (पंढरपूर) समोर रिंगण लाऊन घेतले आणि ” माऊली माऊली ” गजर घुमू लागला. सर्व वातावरण चैतन्यमय बनले होते. ” पुंडलिक वर दे हरी विठ्ठल “गजर झाला आणि अश्व धावू लागले. उभे रिंगण पूर्ण झाले आणि पालखी सोहळा मार्गस्थ झाला . सुधाकर इंगळे महाराज यांचे मार्गदर्शनाने व जोतिराम चांगभले ( प्रदेश अध्यक्ष ), संजय पवार (शहर अध्यक्ष ), किरण श्रीचिप्पा ( सह अध्यक्ष ), निवृत्ती मोरे , तानाजी बेलेराव महाराज, यांच्या प्रमुख उपस्तीथी मध्ये संपन्न झाला . राकेश अन्नम,शंकर भोसले, कुमार गायकवाड,इ पदाधिकारीनी परिश्रम घेतले.