मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागाने कुर्डुवाडी-लातूर विभागात किमी ३९९/८-९ येथे आरसीसी बॉक्स टाकण्याचे काम यशस्वीरित्या पूर्ण केले आहे, ज्यामुळे बार्शी तालुक्यासाठी सिंचन प्रकल्पाचा भाग म्हणून १९०० मिमी व्यासाची पाईपलाईन ओलांडणे सोपे झाले आहे. सोलापूर येथील उजनी कालवा विभाग क्रमांक ८ च्या कार्यकारी अभियंत्याच्या विनंतीवरून हा उपक्रम हाती घेण्यात आला.
३ तास ३० मिनिटांचा काटेकोरपणे नियोजित ट्रॅफिक ब्लॉक घेऊन २४ जानेवारी २०२५ रोजी, प्रकल्पाचा महत्त्वाचा टप्पा पार पडला. सिग्नल आणि टेलिकम्युनिकेशन केबल्स, ओएचई वायर्स आणि जागेच्या अडचणींमुळे निर्माण झालेल्या महत्त्वाच्या आव्हानांवर मात करून बांधकाम पथकाने सर्व रेल्वे लाईनखाली आरसीसी बॉक्स टाकण्याचे काम कार्यक्षमतेने केले.
संसाधनांच्या सुव्यवस्थित तैनातीने काम सुरळीत पार पाडले गेले ज्यामध्ये ३ पोक्लेन मशीन, २ जेसीबी मशीन, २ ट्रॅक्टर, २५० मेट्रिक टन क्षमतेच्या २ क्रेन यांचा समावेश होता. सोलापूर विभागाच्या अभियांत्रिकी विभागाच्या मार्गदर्शनाखाली आणि नियोजनाखाली २५ कुशल कामगारांच्या टीमच्या परिश्रमाने हा पायाभूत सुविधा प्रकल्प राबविण्यात आला.
या कामाची यशस्वी पूर्तता सोलापूर विभागाची पायाभूत सुविधा विकास आणि ऑपरेशनल उत्कृष्टतेसाठीची वचनबद्धता अधोरेखित करते, ज्यामुळे महत्त्वपूर्ण पायाभूत सुविधा प्रकल्पांना चालना मिळाली असून, रेल्वे ऑपरेशन हे सुरळीतपणे सुनिश्चित केले जातात आणि त्याचबरोबर प्रादेशिक विकास उपक्रमांना पाठिंबा दिला जातो. समुदायाच्या हितासाठी अभियांत्रिकी आव्हानांवर मात करण्याची क्षमता हा प्रकल्प दर्शवितो आणि विभागाची कार्यक्षमता, टीमवर्क यांना अधोरेखित करतो.