• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

नुकतेच अंतराळात पाठविलेले 3 उपग्रह बनविण्यात सोलापूरचे सुपुत्र नीरज गाडी यांचे योगदान

Yes News Marathi by Yes News Marathi
January 29, 2025
in इतर घडामोडी
0
नुकतेच अंतराळात पाठविलेले 3 उपग्रह बनविण्यात सोलापूरचे सुपुत्र नीरज गाडी यांचे योगदान
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर : भारतात प्रथमच एका खाजगी कंपनीतर्फे नुकतेच अंतराळात पाठविलेले 3 उपग्रह बनविण्याच्या प्रकल्पात सोलापूरचे सुपुत्र नीरज जनार्दन गाडी यांचे मोठे योगदान आहे. सोलापूरच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवणारी ही गोष्ट असून सोलापूरकरांच्यादृष्टीने ही अतिशय अभिमानास्पद अशी बाब आहे.

बंगळुरुस्थित ‘पिक्सेल’ या खाजगी कंपनीने हे 3 उपग्रह बनविले आहेत. भारताच्या इतिहासात यापूर्वी पाठविण्यात आलेले उपग्रह हे केंद्र शासनाच्या ‘इस्रो’ या संस्थेमार्फत पाठविण्यात आले होते. पण नुकतेच दि. 15 जानेवारी 2025 रोजी अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथून पाठविण्यात आलेले 3 उपग्रह भारताच्या ‘पिक्सेल’ या खाजगी कंपनीमार्फत पाठविण्यात आले. भारतात खाजगी कंपनीमार्फत उपग्रह पाठविण्याची ही पहिलीच वेळ आहे. ‘पिक्सेल’ कंपनीने अमेरिकेतील प्रख्यात ‘स्पेस एक्स’ या कंपनीद्वारे हे उपग्रह अंतराळात पाठविले. या प्रकल्पाकामी पिक्सेल कंपनीची सुमारे 200 टीम कार्यरत होती. यामध्ये या कंपनीमध्ये प्रॉडक्शन इंजिनिअर या क्रमांक दोनच्या पदावर कार्यरत असलेल्या व मूळचे सोलापूरचे असलेल्या नीरज जनार्दन गाडी यांचे योगदान आहे. या कंपनीचे संस्थापक अवेस अहमद व क्षीतिज खंडेलवाल हे असून सन 2019 मध्ये या कंपनीची स्थापना करण्यात आली होती.

राजस्थानमधील बिट्स, पिलानी येथे बी. ई. (मेकॅनिकल) तसेच फ्रान्समध्ये एरोस्पेस इंजीनिअरिंग मध्ये एम.एस. केलेले सोलापूरचे सुपुत्र नीरज गाडी हे सन 2022 मध्ये या कंपनीत प्रॉडक्शन इंजिनिअर यापदी रुजू झाले. अवेस अहमद व क्षीतिज खंडेलवाल हे नीरज यांचे बिट्स, पिलानी येथील बॅचमेट आहेत, हे विशेष.
नीरज हे सोलापुरातील प्रसिद्ध शॉप ॲक्ट कन्सलटंट व अश्विनी सहकारी रुग्णालयाचे माजी संचालक रामचंद्र गाडी यांचे नातू असून युनियन बँकेच्या मुंबई येथील मुख्यालयातील उच्चपदस्थ अधिकारी जनार्दन गाडी यांचे चिरंजीव आहेत. पिक्सेल कंपनीत कार्यरत असलेल्या नीरज गाडी यांनी प्रॉडक्शन इंजिनिअर या नात्याने उपग्रहाविषयी पारंगत असणाऱ्या सुमारे 50 जणांची टीम बनवून त्यांना मार्गदर्शन केले. नंतर उपग्रह तयार करण्याची प्रक्रिया बनवून त्या संपूर्ण प्रक्रियेचे पर्यवेक्षण केले. उपग्रह बनविल्यावर कॅलिफोर्निया येथे जाऊन स्पेस एक्स या कंपनीच्या रॉकेटशी उपग्रहांची जुळवाजुळवही केली.

हे तीनही उपग्रह अंतराळात यशस्वीपणे पाठवण्यात पिक्सेल कंपनीला यश आले, ज्याचे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ या कार्यक्रमात कौतुक व अभिनंदन केले.
एकंदर नीरज गाडी यांचे या कामी असलेले योगदान सोलापूरसाठी भूषणावह मानले जात आहे. याबाबत त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.


उपग्रह काढणार पृथ्वीवरील विविध गोष्टींची छायाचित्रे

पिक्सेल कंपनीने ‘हायपर स्पेक्ट्रल पिक्चर’बाबत इनोव्हेशन केले आहे. ज्याद्वारे उपग्रहामार्फत पृथ्वीवरील
सुमारे 200 विविध रंगांची छायाचित्रे टिपता येणार आहे. त्याचा उपयोग करून वृक्ष, पीक, माती, हवा, पाणी, शहरी नियोजन आदींबाबत सूक्ष्म वैज्ञानिक माहिती मिळवता येणार आहे. ‘हायपर स्पेक्ट्रल पिक्चर’च्या माध्यमातून एका छायाचित्रात 100 स्क्वेअर किलोमीटरपर्यंतचा डेटा उपलब्ध होणार आहे, अशी माहिती नीरज गाडी यांनी दिली.


येत्या 6 महिन्यांत आणखीन 3 उपग्रह पाठविणार

पिक्सेल कंपनीच्यावतीने 3 उपग्रह यशस्वीपणे अंतराळात पाठविण्याचे मिशन पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर येत्या 6 महिन्यांत आणखीन 3 उपग्रह अंतराळात पाठविण्याचा या कंपनीचा प्रकल्प आहे. यासंदर्भात कंपनीची टीम मेहनत घेत आहे. हा प्रकल्पदेखील यशस्वी होईल, असा कंपनीला विश्वास आहे.

Previous Post

सोलापूर जिल्हा व शहर राष्ट्रवादीची अजितदादांसोबत चर्चा

Next Post

प्रणिती चांगभले हिचे संगीत विशारद परीक्षेत यश

Related Posts

मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळातर्फे शनिवारी बक्षीस वितरण..
इतर घडामोडी

मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळातर्फे शनिवारी बक्षीस वितरण..

August 27, 2026
नेपाळमधील पूरस्थिती; महाराष्ट्रातील नागरिकांसाठी २४ तास हेल्पलाईन सुरू
Blog

नेपाळमधील पूरस्थिती; महाराष्ट्रातील नागरिकांसाठी २४ तास हेल्पलाईन सुरू

August 27, 2026
चाकणमध्ये होणार 2 हजार 320 कोटींची गुंतवणूक; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार ..!
इतर घडामोडी

चाकणमध्ये होणार 2 हजार 320 कोटींची गुंतवणूक; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार ..!

August 27, 2026
दक्षिण सोलापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये ‘स्पोकन इंग्लिश’ उपक्रमास प्रारंभ
इतर घडामोडी

दक्षिण सोलापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये ‘स्पोकन इंग्लिश’ उपक्रमास प्रारंभ

August 26, 2026
मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांवर तातडीने कार्यवाही करा; राधाकृष्ण विखे पाटलांचे निर्देश
इतर घडामोडी

मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांवर तातडीने कार्यवाही करा; राधाकृष्ण विखे पाटलांचे निर्देश

August 26, 2026
चाकणच्या विकासाचा रोडमॅप तयार; सुनेत्रा पवारांकडून उच्चस्तरीय समितीच्या कामाचा आढावा
इतर घडामोडी

चाकणच्या विकासाचा रोडमॅप तयार; सुनेत्रा पवारांकडून उच्चस्तरीय समितीच्या कामाचा आढावा

August 26, 2026
Next Post
प्रणिती चांगभले हिचे संगीत विशारद परीक्षेत यश

प्रणिती चांगभले हिचे संगीत विशारद परीक्षेत यश

ताज्या बातम्या

मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळातर्फे शनिवारी बक्षीस वितरण..

मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळातर्फे शनिवारी बक्षीस वितरण..

August 27, 2026
सोलापूर ZP च्या 10 कोटी रुपयांच्या औषध खरेदीची होणार चौकशी…!

सोलापूर ZP च्या 10 कोटी रुपयांच्या औषध खरेदीची होणार चौकशी…!

August 27, 2026
नेपाळमधील पूरस्थिती; महाराष्ट्रातील नागरिकांसाठी २४ तास हेल्पलाईन सुरू

नेपाळमधील पूरस्थिती; महाराष्ट्रातील नागरिकांसाठी २४ तास हेल्पलाईन सुरू

August 27, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026