सोलापूर : जिल्ह्यातील तळे हिप्परगा येथील आदिवासी पारधी समाजातील गिरीश विश्वनाथ काळे यांची T 20 क्रिकेट असोसिएशन ऑफ इंडिया मध्ये निवड झाली असून लवकरच सामने होणार असून त्यांना त्यांचा अष्टपैलू खेळ पाहून निवडकर्त्यांनी ओपनिंग बॅट्समन म्हणून नियुक्ती केली असून त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राचे नाव लौकिक होणार तसेच सोलापूर जिल्ह्याचेही नाव संपूर्ण भारतभर झळकणार.
गिरीश काळे यांची नियुक्ती झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रातून सोलापूर जिल्ह्यातून आदिवासी पारधी समाजातील विविध घटकांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
तळे हिप्परगा तालुका उत्तर सोलापूर येथील एक आदिवासी पारधी समाजातील गरीब कुटुंबातील जिद्द चिकाटी काय असते सिद्ध करून दाखवून देत संपूर्ण भारतात प्रसिद्ध असलेले T 20 स्पर्धेमध्ये ओपनिंग बॅट्समन म्हणून नियुक्ती झाली हे सोलापूर जिल्ह्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे.