• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

चहा आठ रुपये, शाकाहारी थाळी ७०, मांसाहारी थाळी १२० रुपये; निवडणूक आयोगाकडून प्रचार खर्चाचे दरपत्रक जाहीर

Yes News Marathi by Yes News Marathi
October 24, 2024
in इतर घडामोडी
0
चहा आठ रुपये, शाकाहारी थाळी ७०, मांसाहारी थाळी १२० रुपये; निवडणूक आयोगाकडून प्रचार खर्चाचे दरपत्रक जाहीर
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर : शाकाहारी थाळी ७०, मांसाहारी थाळी १२०, पोहे, शिरा, उपमा १५, तर चहा ८ रुपये हे आहेत विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांना ठरवून दिलेले दरपत्रक. विधानसभा निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने प्रचार खर्चासाठी अशा एकूण २५२ वस्तूंची दरसुची जाहीर केली असून ठरवून दिलेल्या दरापेक्षा जास्त खर्च केल्यास आचारसंहितेचा भंग केल्याबद्दल उमेदवारांवर कारवाईचा इशारा दिला आहे.

विधानसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. उमेदवारांनी केलेला खर्च उमेदवाराला निवडणूक आयोगाला सादर करावा लागणार आहे. उमेदवारांनी केलेल्या खर्च आणि सादर केलेल्या खर्चाची निवडणूक शाखेकडून पडताळणी केली जाणार आहे. या वेळी निवडणूक आयोगाने वाढती महागाई लक्षात घेऊन उमेदवाराला ४० लाखांपर्यंत खर्च करण्याची उभा दिली आहे. यापूर्वी ही मर्यादा २८ लाखांची होती. यामध्ये या वेळी वाढ करण्यात आली आहे. बैठका, सभा, रॅली, जाहिरात पत्रक, वाहनांचा खर्च आदींचा यामध्ये समावेश आहे. हा सर्व खर्च निवडणूक आयोगाच्या अधीन राहून करावा लागणार आहे. यासाठी जिल्हा निवडणूक शाखेने खर्चाचे दर निश्चित केले आहेत. उमेदवारी अर्ज दाखल केल्यापासून हा खर्च ग्राह्य धरला जातो. यासाठी उमेदवारांना राष्ट्रीयीकृत किंवा सहकारी बँकेत खाते उघडावे लागते.
बँडपथक वीस माणसांसाठी प्रतिदिन एक हजार रुपये, पाच माणसांचे पोवाडा पथक पाच हजार रुपये, तीन माणसांचे हलगी पथक १५०० रुपये, २० जणांचे झांजपथक १० हजार रुपये, शिंगवादन प्रतिव्यक्ती तीनशे रुपये, बँजो ग्रुप चार माणसांसाठी तीन-चार तासांसाठी २५०० रुपये, पुष्पगुच्छ मोठा २२० रुपये, पुष्पगुच्छ मध्यम १८० रुपये, पुष्पगुच्छ लहान शंभर रुपये, हार मोठा ३२५, मध्यम २३५ रुपये, लहान १२५ रुपये असा दर ठरवण्यात आला आहे.

पदार्थ आणि दरपत्रक
चहा आठ रुपये, कॉफी १२ रुपये, बिस्कीट पुडा दहा रुपये, कोल्ड्रिंक वीस रुपये, कोकम सरबत, लस्सी, पोहे, उपीट, शिरा प्रत्येकी १५ रुपये, वडापाव १० रुपये, इडली २५ रुपये, मिसळ ४९ रुपये, समोसा पंधरा रुपये, शाकाहारी जेवण सत्तर रुपये, मांसाहारी जेवण १२० रुपये.

Previous Post

आज राज्यात कोण-कोणत्या बड्या नेत्यांनी अर्ज भरले पहा…

Next Post

पुणे : वॉशिंग्टन सुंदरने घेतल्या ७ विकेट्स… न्यूझीलंडचा पहिला डाव २५९ धावांत आटोपला

Related Posts

शिवारायांचा राज्याभिषेक हे क्रांतीकारी पाऊल – सुधाकर इंगळे महाराज
इतर घडामोडी

शिवारायांचा राज्याभिषेक हे क्रांतीकारी पाऊल – सुधाकर इंगळे महाराज

June 27, 2026
‘या हुसेन…या हुसेन’च्या जयघोषात मोहरम उत्सवाची भक्तिभावाने सांगता
इतर घडामोडी

‘या हुसेन…या हुसेन’च्या जयघोषात मोहरम उत्सवाची भक्तिभावाने सांगता

June 26, 2026
महाकर्जमुक्तीचा ऐतिहासिक निर्णय : शेतकऱ्यांना दिलासा
इतर घडामोडी

महाकर्जमुक्तीचा ऐतिहासिक निर्णय : शेतकऱ्यांना दिलासा

June 26, 2026
अंमली पदार्थांचे सेवन विरोधी दिन;आंतरराष्ट्रीय दिनानिमित्त जनजागृती
इतर घडामोडी

अंमली पदार्थांचे सेवन विरोधी दिन;आंतरराष्ट्रीय दिनानिमित्त जनजागृती

June 26, 2026
सोलापूर जिल्ह्यासाठी वरदान ठरणारा अत्याधुनिक रोटरी नवजात शिशु अतिदक्षता विभाग लोकार्पण सोहळा
इतर घडामोडी

सोलापूर जिल्ह्यासाठी वरदान ठरणारा अत्याधुनिक रोटरी नवजात शिशु अतिदक्षता विभाग लोकार्पण सोहळा

June 26, 2026
लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त संभाजी आरमार च्या वतीने अभिवादन…
इतर घडामोडी

लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त संभाजी आरमार च्या वतीने अभिवादन…

June 26, 2026
Next Post
पुणे : वॉशिंग्टन सुंदरने घेतल्या ७ विकेट्स… न्यूझीलंडचा पहिला डाव २५९ धावांत आटोपला

पुणे : वॉशिंग्टन सुंदरने घेतल्या ७ विकेट्स… न्यूझीलंडचा पहिला डाव २५९ धावांत आटोपला

ताज्या बातम्या

शिवारायांचा राज्याभिषेक हे क्रांतीकारी पाऊल – सुधाकर इंगळे महाराज

शिवारायांचा राज्याभिषेक हे क्रांतीकारी पाऊल – सुधाकर इंगळे महाराज

June 27, 2026
श्री शिवराज्याभिषेक दिनानिमित्त देवदर्शन पदयात्रा पालखी मिरवणूक उत्साहात

श्री शिवराज्याभिषेक दिनानिमित्त देवदर्शन पदयात्रा पालखी मिरवणूक उत्साहात

June 27, 2026
“TET परीक्षेचा पेपर ठाण्यात फुटला:प्रश्नपत्रिका सापडल्याचा दावा; उद्याची परीक्षा स्थगित, अनेक जण ताब्यात”

“TET परीक्षेचा पेपर ठाण्यात फुटला:प्रश्नपत्रिका सापडल्याचा दावा; उद्याची परीक्षा स्थगित, अनेक जण ताब्यात”

June 27, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मॅच रिपोर्ट: साऊथ सोलापूर ब्लूचा दिमाखदार विजय

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026