सोलापूर :- जिजाऊ ज्ञान मंदिर इंग्लिश मिडियम स्कूल, कोंडी येथील प्रशालेने एम टी एस ऑल्मपिड परिक्षेत घवघवीत यश मिळवले. यात प्रशालेतील आठ विदयार्थी या परिक्षेत बसले होते. त्यातील कु. श्रावणी राहूल वाघचवरे इयत्ता 7 वी तील विद्यार्थ्यांनी जिल्ह्यात 1० वी तर कु तेजस्विनी श्रीराम भोसले इयत्ता 4 तील विद्यार्थ्यांनी ही जिल्हयात13 वी आली. प्रशालेचे संस्थापक गणेश नीळ यांनी यशस्वी विदयार्थीनीचा पुस्तक देऊन सत्कार करण्यात आला.
तसेच मार्गदर्शक शिक्षक रवि कोतकुंडे यांचा देखील सत्कार करण्यातआला.प्रशालेच्या मुख्याध्यापिका अर्चना औरादे यांनी यशस्वी विद्यार्थ्यांना अनमोल असे मार्गदर्शन केले. यावेळी प्रशालेचे सहशिक्षक वैभव मसलकर, शीतल कांबळे,अजितकुमार जाधव, करिश्मा शेख, दिलिप भोसले,संकेत मोरे,विश्वनाथ उपाध्ये, सिद्धराम नीळ आदि उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन रवि कोतकुंडे यांनी केले तर आभार प्रदर्शन शीतल कांबळे यांनी केले.











