सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरुपदी डॉ. प्रकाश महानवर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यपाल तथा सार्वजनिक विद्यापीठांचे कुलपती रमेश बैस यांनी ही नियुक्ती केली. ५६ वर्षांचे डॉ. प्रकाश महानवर हे सध्या मुंबई विद्यापीठाच्या दूर व मुक्त अध्ययन संस्थेत वरिष्ठ प्राध्यापक व संचालकपदावर कार्यरत आहेत. विद्यापीठाच्या पूर्वीच्या कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांचा कार्यकाळ गेल्या ५ मे रोजी संपल्यामुळे रिक्त झालेल्या कुलगुरूपदाचा अतिरिक्त कारभार होते. मुंबईच्या डॉ. होमी भाभा राज्य विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. रजनीश कामत हे पाहात होते.