• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Monday, June 9, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

आमदार नसतानाही मिलिंद नार्वेकर सभागृहात ! चूक झाल्याचं सांगत म्हणाले…

by Yes News Marathi
February 27, 2023
in मुख्य बातमी
0
आमदार नसतानाही मिलिंद नार्वेकर सभागृहात ! चूक झाल्याचं सांगत म्हणाले…
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे. राज्यपाल रमेश बैस यांच्या अभिभाषणानं अधिवेशनाची सुरुवात झाली आहे. आजपासून सुरू होणाऱ्या अधिवेशनात सभागृहात गदारोळ आणि बहिष्कार पाहायला मिळणार की खरंच जनतेच्या प्रश्नांवर खल होऊन ठोस पावलं उचलली जाणार हे पाहावं लागणार आहे. दरम्यान आमदार नसतानाही ठाकरे गटाचे मिलिंद नार्वेकर सेंट्रल हॉलमध्ये दाखल झाल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली.
वृत्तवाहिनेने दिलेल्या माहितीनुसार राज्यपालांच्या अभिभाषणासाठी मिलिंद नार्वेकर सभागृहात येऊन बसले. त्यानंतर आदित्य ठाकरे यांनी त्यांची चूक लक्षात आणून दिली. त्यानंतर नार्वेकर उठून बाहेर गेले. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनीही त्यांना बाहेर जाण्याच्या सूचना दिल्या. पण या सगळ्यामध्ये सुरक्षारक्षकांनी नार्वेकर यांना सभागृहात कसे काय सोडले ? असा प्रश्न निर्माण उभा होत आहे
मिलिंद नार्वेकराचं स्पष्टीकरण
नार्वेकर अचानक सभागृहात आल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. मात्र प्रेक्षक गॅलरी समजून चुकून सेंट्रल हॉलमध्ये जाऊन बसलो असे म्हणत नार्वेकरांनी स्पष्टीकरण दिले आहे. चूक लक्षात आल्यावर लगेच बाहेर पडलो. असंही ते पुढे म्हणाले.
त्यांची आमदार व्हायची इच्छा
नार्वेकर यांच्या या कृतीवर शिंदे गटाच्या नेत्यांनी टोमणा मारला आहे. यावर संजय शिरसाठ म्हणाले की, “त्यांना आमदार होणार असे वाटते.”
संजय शिरसाठ म्हणाले की, मिलिंद नार्वेकर यांची अनेक वर्षांपासून इच्छा आहे की मी आमदार व्हायला पाहिजे. उद्धव ठाकरे यांनी त्यांना आमदार बनवले नाही यात आमचा दोष नाही. मिलिंद नार्वेकर सगळ्यांच्या मधले दुवा आहेत. मिलिंद नार्वेकर लवकर आमच्याकडे येऊ शकतात. त्यांना आमदार होणार असे वाटते.

Previous Post

अडीच महिन्यांच्या बाळाला घेऊन आलेल्या सरोज अहिरे यांना हिरकणी कक्ष पाहून आश्रू अनावर

Next Post

भीषण अपघातात आजीसह नातवाचा जागीच मृत्यू

Next Post
भीषण अपघातात आजीसह नातवाचा जागीच मृत्यू

भीषण अपघातात आजीसह नातवाचा जागीच मृत्यू

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group