• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

“बेटी बचाव व बेटी पढाव” कार्यक्रमात सिईओ स्वामी यांनी सृष्टी पाटील या बालिकेस दिला अध्यक्षपदाचा मान !

Yes News Marathi by Yes News Marathi
January 23, 2023
in इतर घडामोडी
0
“बेटी बचाव व बेटी पढाव” कार्यक्रमात सिईओ स्वामी यांनी सृष्टी पाटील या बालिकेस दिला अध्यक्षपदाचा मान !
0
SHARES
1
VIEWS

करमाळा- जिल्ह्यात हजार मुलामागे फक्त ९२१ मुली आहेत. राज्याच्या सरासरीमध्ये सोलापूर जिल्हा खुप मागे आहे. मुलींची संख्यावाढ चिंताजनकआहे. यासाठी मुलींना सन्मान द्या असे सांगत “बेटी बचाव व बेटी पढाव” कार्यक्रमात सिईओ दिलीप स्वामी यांनी करमाळा तालुक्यांतील फिसरे गावात पार पडलेल्या कार्यक्रमात सृष्टी पाटील या बालिकेस अध्यक्षपदाचा मान दिला. मुलांना सन्मान द्या असा संदेश सिईओ दिलीप स्वामी यांनी या कार्यक्रमातून दिला.

  • करमाळा तालुक्यांतील फिसरे येथे यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाचे वतीने राष्ट्रीय सेवा योजना स्तर २ अंतर्गत युवा स्वच्छतादूत शिबीराचे आयोजन करणेत आले होते. या समारोप समारंभास उप मुख्य कार्यकारी अधिकारी जावेद शेख, गटविकास अधिकारी मनोज राऊत, डाॅक्टर पिंपळे, उपप्राचार्य किरदाट, कार्यक्रम अधिकारी नवनाथ राख, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव, सरपंच प्रदीप दौंडे , उप सरपंच विजय औताडे, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे जिल्हा समन्वयक लक्ष्मण राख, माजी उपसरपंच संदीप नेटके, पाणी फौडंशनचे प्रतिक गुरव उपस्थित होते. ग्रामसेवक दादासाहेब केवारे व रासेयो जिल्हा समन्वयक लक्ष्मण राख व दोन स्वयंसेवकांचा यावेळी गौरव करणेत आला. अध्यक्षपदाची मान दिलेले सृष्ट्री पाटील या बालिकेचा देखील गौरव करणेत आला. अंगणवाडी सैनिकांनी एकांकिका सादर करून डोळ्यात झणझणीत अंजन घालून मुलींचा टक्के वाढविण्याचे आवाहन केले. याबेळी दोन मुली असणाऱ्या पालकांचा गौरव करणेत आला.
  • यावेळी बोलताना सिईओ दिलीप स्वामी म्हणाले, विकास कामात राजकारण आणू नका. चांगले काम होणेसाठी सेवेची सवय महत्वपुर्ण आहे. राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे माध्यमातून स्वच्छतेचे विविध उपक्रम राबविणेत येत आहेत. शासनास स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गत वैयक्तीक शौचालय तसेच सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन, शौषखड्डे घेणेसाठी शासनास पुढाकार घ्यावा लागतो, आदी उपक्रम राबविणेत येत असल्याचे सिईओ स्वामी यांनी सांगितले. या शिबीराच्या माध्यमातून “नो नाॅलेज विदाऊट काॅलेज” हि संकल्पना राबवण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल असे त्यांनी म्हंटले.
  • वेळेचे महत्व लक्षात घ्या
    महाविद्यालयीन जिवनात वेळेचे महत्व खुप आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी वेळेला महत्व देऊन आपल्या भविष्याकडे वाटचाल करणे महत्वाचे आहे.
  • माझ्या दोन मुली माझा अभिमान-
    सिईओ दिलीप स्वामी म्हणाले, मला पण फक्त दोन मुली आहेत. दोन मुलींनंतर मी कुटूंब नियोजन केले आहे. मुलींना शिकवा. मुलींना वाढवा. बेटी बचाव बेटी पढाव भिंतीवर लिहून होणार नाही. तर त्याची अंमलबजावणी प्रत्यक्षपणे आपल्या आयुष्यात करणे गरजेचे आहे.
  • सायकल बॅंकेत ३ हजार सायकली !
    सोलापूर जिल्ह्यात सायकल बॅंकेत ३ हजार सायकली आहेत. अद्याप साडेतीन हजार मुली सायकलींविना आहेत. सायकल बॅंकेसाठी खुप प्रतिसाद मिळत आहे.
  • जलजीवन मिशन ची कामे वेळेत पुर्ण करा –
    जलजीवन मिशन अंतर्गत फिसरे गावास ७० लक्ष रूपये मंजूर झाले आहेत. या योजनेची निविदा प्रक्रिया पुर्ण होत आहे. ही योजना वेळेत पुर्ण करा. कामे चांगल्या दर्जाची होतील याकडे लक्ष द्या. “हर घर नल से जल” या अभियानातून प्रत्येक घरास नळ कनेक्शन द्या असे आवाहन सिईओ दिलीप स्वामी यांनी यावेळी केले.

उप मुख्य कार्यकारी अधिकारी जावेद शेख यांनी जिल्हयात बेटी बचाव बेटी पढाओ अभियान प्रभावी पण राबविणेत येत असल्याचे सांगितले.
बेटी बचाव या बाबत गटविकास अधिकारी मनोज राऊत यांनी आशा क्लिनीक ची सोय प्रत्येक गावात सोय करणेत आली आहे. या आशा क्लिनिकमध्ये असणारे आशांना डिजीटल थर्मामीटर, गोळ्यांचे कीट, नेबूलायजर, आॅक्सीमिटर , वेगवेगळे वस्तुंचे किट देणेत येत आहे. गावात एक खोली आशा क्लनिक साठी उपलब्ध करून देणेत येत असल्याचे गटविकास अधिकारी मनोज राऊत यांनी सांगितले. ग्रामपंचायतीचे कर्मचारी यांना आकाशी रंगांचा युनिफाॅर्म देणेत आलेला आहे. तालुक्यांतील सर्व कर्मचारी युनिफार्ममध्ये असणार आहेत. राज्यातील एखाद्या पंचायत समितीअंतर्गत असलेल्या सर्व ग्रामपंचायतीमध्ये एकाच रंगात युनिफार्म असलेला करमाळा हा एकमेव तालुका असणार आहे. असेही गटविकास अधिकारी राऊत यांनी सांगितले.
माजी उपसरपंच संदीप नेटके,यांनी मनोगत व्यक्त केले.

गटविकास अधिकारी राऊत यांचा करमाळा पॅटर्न …!
आशा क्लनिक ची नवी आशा ….!
ग्रामपंचायत कर्मचारी यांना कार्पोरेट कंपनीतील कर्मचारी यांचे प्रमाणे आकाशी कलरचा ड्रेस तर आशा चा चांगला उपयोग करमाळा तालुक्यांत केले आहे. नवी दिल्लीत ज्याप्रमाणे मोहल्ला क्लिनिकची स्थापना झाली त्या धर्तीवर करमाळा तालुक्यात प्रत्येक गावात आशा क्लनिक सुरू करून करमाळा पॅटर्न सुरू ठेवला आहे. २२० ग्रामपंचायत कर्मचारी यांना ड्रेस कोड दिला आहे. सिईओ स्वामी यांनी या नाविण्यपुर्ण उपक्रमाबद्दल कौतुक केले.

सिईओ व बालिकांची बैलगाडीतून मिरवणूक
सिईओ दिलीप स्वामी यांनी “मुली वाचवा मुली शिकवा” या अभियान अंतर्गत मुलींची सिईओ दिलीप स्वामी, जिल्हा प्रकल्प अधिकारी जावेद शेख व गटविकास अधिकारी मनोज राऊत यांचे सह गावातून बैलगाडीतून मिरवणूक काढत गावात मुली वाचवा व मुली शिकवा यांचा संदेश देणेत आला. वाजत गाजत मुली वाचवा अभियानाचा जागर करणेत आला.

Previous Post

औरंगाबादकर सराफ पेढीतर्फे मोत्यांच्या दागिन्यांच्या प्रदर्शनाचा शुभारंभ

Next Post

पंढरपूरमध्ये एका ९ वर्षाच्या मुलाचा मृतदेह आढळल्यामुळे उडाली खळबळ

Related Posts

सातारा हिल हाफ मॅरेथॉनमध्ये धावताना 65 वर्षीय शास्त्रज्ञाचा मृत्यू.
इतर घडामोडी

सातारा हिल हाफ मॅरेथॉनमध्ये धावताना 65 वर्षीय शास्त्रज्ञाचा मृत्यू.

September 8, 2026
असुरक्षित स्पर्श हा कायद्याने गुन्हा- न्यायाधीश अमोलकुमार देशपांडे
इतर घडामोडी

असुरक्षित स्पर्श हा कायद्याने गुन्हा- न्यायाधीश अमोलकुमार देशपांडे

September 7, 2026
एसटी स्टँडमधील ‘गर्दी’चा फायदा घेत सोन्याचे दागिने लंपास; सराईत चोरट्याला बेड्या!
इतर घडामोडी

एसटी स्टँडमधील ‘गर्दी’चा फायदा घेत सोन्याचे दागिने लंपास; सराईत चोरट्याला बेड्या!

September 7, 2026
जिल्हा लोकशाही दिनात 47 अर्ज दाखल; मोहोळ आणि उपनिबंधक कार्यालयाकडे सर्वाधिक तक्रारी
इतर घडामोडी

जिल्हा लोकशाही दिनात 47 अर्ज दाखल; मोहोळ आणि उपनिबंधक कार्यालयाकडे सर्वाधिक तक्रारी

September 7, 2026
सोलापूरात ‘जनकल्याण आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’ चे वितरण
इतर घडामोडी

सोलापूरात ‘जनकल्याण आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’ चे वितरण

September 7, 2026
मतदार यादी पुनरिक्षणासाठी विभागीय आयुक्त शीतल तेली-उगले उद्या सोलापूर दौऱ्यावर
इतर घडामोडी

मतदार यादी पुनरिक्षणासाठी विभागीय आयुक्त शीतल तेली-उगले उद्या सोलापूर दौऱ्यावर

September 7, 2026
Next Post
पंढरपूरमध्ये एका ९ वर्षाच्या मुलाचा मृतदेह आढळल्यामुळे उडाली खळबळ

पंढरपूरमध्ये एका ९ वर्षाच्या मुलाचा मृतदेह आढळल्यामुळे उडाली खळबळ

ताज्या बातम्या

सोलापुरातील 10 आमदारांची दिशा कमिटीला दांडी, 3 खासदार,1 आमदारांनी घेतले फैलावर…

सोलापुरातील 10 आमदारांची दिशा कमिटीला दांडी, 3 खासदार,1 आमदारांनी घेतले फैलावर…

September 8, 2026
एसआयआर अंतर्गत मतदार यादीत प्रत्येक पात्र मतदाराच्या समावेशासाठी राजकीय पक्षांनीही सहकार्य करावे-विभागीय आयुक्त शितल तेली-उगले

एसआयआर अंतर्गत मतदार यादीत प्रत्येक पात्र मतदाराच्या समावेशासाठी राजकीय पक्षांनीही सहकार्य करावे-विभागीय आयुक्त शितल तेली-उगले

September 8, 2026
सातारा हिल हाफ मॅरेथॉनमध्ये धावताना 65 वर्षीय शास्त्रज्ञाचा मृत्यू.

सातारा हिल हाफ मॅरेथॉनमध्ये धावताना 65 वर्षीय शास्त्रज्ञाचा मृत्यू.

September 8, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026