• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सोलापूर विद्यापीठ / खेळामध्ये देशाला आघाडीवर नेण्यासाठी युवा ऊर्जा खर्ची घाला: राज्यपाल कोश्यारी

admin by admin
December 26, 2019
in मुख्य बातमी
0
सोलापूर विद्यापीठ / खेळामध्ये देशाला आघाडीवर नेण्यासाठी युवा ऊर्जा खर्ची घाला: राज्यपाल कोश्यारी
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर-खेळात एक वेगळी ऊर्जा आहे. खेळामुळे शरीर स्वास्थ्य उत्तम राहते. दुर्दैवाने खेळ क्षेत्रात भारत मागे आहे. ऑलम्पिकमध्ये भारताला पदक कमी मिळतात. त्यामुळे युवा खेळाडूंनी सराव तसेच परिश्रम करत आपली ऊर्जा खर्ची घालत जागतिक पातळीवर खेळ क्षेत्रात देशाला पुढे घेऊन जावे, असे आवाहन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले.

गुरुवारी, पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात आयोजित राज्यस्तरीय तेविसावी आंतर विद्यापीठ क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. या समारंभाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस या होत्या. याप्रसंगी विद्यापीठाचे प्रभारी प्र कुलगुरू डॉ. विकास कदम, कुलसचिव डॉ. विकास घुटे यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी क्रीडा विभागाचे संचालक डॉ. सुरेश पवार यांनी स्वागत व प्रस्ताविक केले.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी म्हणाले की, आज पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात राज्यस्तरीय क्रीडा महोत्सवाचे सुंदर नियोजन करण्यात आले आहे. या महोत्सवासाठी सोलापूर जिल्ह्यातील देणगीदारांनी भरीव मदत केली आहे, ही आनंदाची बातमी आहे. यामुळे खेळाडूंचा उत्साह निश्चितच वाढेल. खेळात व आयुष्यात यशस्वी होण्यासाठी विद्यार्थ्यांनी लक्ष्य केंद्रित करणे आवश्यक आहे. परिश्रमही खूप महत्त्वाचे आहे. निरोगी राहण्यासाठी व शरीर स्वास्थ्य उत्तम ठेवण्याकरिता योग आणि ध्यान करणे गरजेचे आहे. यासाठीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी योगाचे महत्त्व विशद करून जागतिक पातळीवर 21 जून रोजी योग दिन साजरा करण्यास सुरुवात केली. विद्यार्थी खेळाडूंनीही नियमित योग व ध्यान करावे, असे आवाहन राज्यपाल कोश्यारी यांनी यावेळी केले.

आज सोलापूर विद्यापीठात या महोत्सवाचे सूत्रसंचालन संस्कृत भाषेतून करण्यात आले, ही फार आनंदाची बाब आहे. याच बरोबर या विद्यापीठात विविध भाषा शिकवले जाते, ही चांगली गोष्ट आहे. सर्वांना विविध भाषा येणे आवश्यक आहे. मी पण मराठी शिकलो. महाराष्ट्रात मराठी बोलता येणे गरजेचे असल्याचे मत राज्यपाल कोश्यारी यांनी यावेळी व्यक्त केले.

कुलगुरू डॉ. फडणवीस यांनी क्रीडा महोत्सवाची माहिती दिली. विद्यापीठाकडे एकही क्रीडांगण उपलब्ध नसताना आज विद्यापीठाने विविध 15 क्रीडांगणे आंतरराष्ट्रीय दर्जाची तयार केली आहेत. यासाठी जिल्ह्यातील देणगीदारांनी मोठी मदत केली आहे. सीएसआर फंडातून काही क्रीडांगणे साकारली आहेत, असेही त्यांनी यावेळी सांगितले. आता क्रीडा महोत्सवातील सर्व खेळाडू विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी केली जाणार आहे. त्याचबरोबर या विद्यार्थ्यांना मार्गदर्शक आरोग्य पुस्तिका दिली जाणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. या महोत्सवासाठी माजी विद्यार्थ्यांचेही ऑनलाइन नोंदणीसाठी सहकार्य लाभल्याचे कुलगुरू डॉ. फडणवीस यांनी सांगितले.

प्रारंभी 20 विद्यापीठाच्या संघांचे मार्च पास झाले. क्रीडा ज्योतीचे स्वागत करण्यात आले. 30 डिसेंबर पर्यंत चालणाऱ्या या क्रीडा महोत्सवात साडेतीन हजार विद्यार्थ्यांचा सहभाग आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. ममता बोल्ली व प्रा. रेवा कुलकर्णी यांनी केले तर आभार कुलसचिव डॉ. विकास घुटे यांनी मानले.

YES News Marathi

Previous Post

निसर्ग

Next Post

संत ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीवर इथून पुढे अभिषेक आणि पूजा होणार नाही

Related Posts

मनोज जरांगे पाटील यांचा सरकारवर घणाघात ! सरकारला उघड इशारा..
मुख्य बातमी

मनोज जरांगे पाटील यांचा सरकारवर घणाघात ! सरकारला उघड इशारा..

August 8, 2026
नीट पेपर फुटी प्रकरणी विषय तज्ञच मास्टरमाईंड..! CBI कडून आरोप पत्र दाखल..
मुख्य बातमी

नीट पेपर फुटी प्रकरणी विषय तज्ञच मास्टरमाईंड..! CBI कडून आरोप पत्र दाखल..

August 8, 2026
तीस कोटीचा हा रस्ता महिन्याभरातच फोडला जाणार आहे…!
मुख्य बातमी

तीस कोटीचा हा रस्ता महिन्याभरातच फोडला जाणार आहे…!

August 7, 2026
‘शिवरत्न’ सभागृहाचे नाव कायम ठेवण्याची मागणी; मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन
मुख्य बातमी

‘शिवरत्न’ सभागृहाचे नाव कायम ठेवण्याची मागणी; मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन

August 6, 2026
आकांक्षित तालुक्यात 38 उदिष्ठ्ये वेळेत पुर्ण करा- सिईओ कुशल जैन
मुख्य बातमी

आकांक्षित तालुक्यात 38 उदिष्ठ्ये वेळेत पुर्ण करा- सिईओ कुशल जैन

August 6, 2026
भावसार व्हिजन इंडिया, सोलापूर सेंट्रलतर्फे महिलांसाठी मोफत ‘पिंक ओपीडी’ आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात संपन्न
मुख्य बातमी

भावसार व्हिजन इंडिया, सोलापूर सेंट्रलतर्फे महिलांसाठी मोफत ‘पिंक ओपीडी’ आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात संपन्न

August 6, 2026
Next Post
संत ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीवर इथून पुढे अभिषेक आणि पूजा होणार नाही

संत ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीवर इथून पुढे अभिषेक आणि पूजा होणार नाही

ताज्या बातम्या

मनोज जरांगे पाटील यांचा सरकारवर घणाघात ! सरकारला उघड इशारा..

मनोज जरांगे पाटील यांचा सरकारवर घणाघात ! सरकारला उघड इशारा..

August 8, 2026
नीट पेपर फुटी प्रकरणी विषय तज्ञच मास्टरमाईंड..! CBI कडून आरोप पत्र दाखल..

नीट पेपर फुटी प्रकरणी विषय तज्ञच मास्टरमाईंड..! CBI कडून आरोप पत्र दाखल..

August 8, 2026
सोलापूरकडे जाणाऱ्या ट्रकमधून तब्बल ६.५४ कोटींचा गांजा जप्त

सोलापूरकडे जाणाऱ्या ट्रकमधून तब्बल ६.५४ कोटींचा गांजा जप्त

August 7, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026