• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सोलापुरात होणार स्टार्टअप फेस्टिव्हल देशभरातील नवउद्योजकांना देणार आमंत्रण

Yes News Marathi by Yes News Marathi
November 10, 2022
in मुख्य बातमी
0
सोलापुरात होणार स्टार्टअप फेस्टिव्हल देशभरातील नवउद्योजकांना देणार आमंत्रण
0
SHARES
1
VIEWS

जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांची नियोजनाबाबतच्या बैठकीत माहिती

सोलापूर : जिल्ह्यात रस्त्यांचे आणि रेल्वेचे जाळे निर्माण झाले आहे. यामुळे नव्याने उद्योग सुरू व्हावेत, असे वातावरण निर्मिती करावयाची आहे. स्थानिक आणि इतर नवउद्योजकांना चालना मिळण्यासाठी स्टार्टअप फेस्टिव्हल कार्यक्रमाचे नियोजन करण्यात येत आहे. यासाठी देशभरातील नवउद्योजकांना आमंत्रित करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली.

जिल्हाधिकारी कार्यालय येथे सोलापूर स्टार्टअप फेस्टिव्हल आयोजनाबाबत प्राथमिक बैठकीत श्री. शंभरकर बोलत होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, शासकीय तांत्रिक संशोधन व विकास परिषद नागपूरचे सदस्य सचिव केतन मोहितकर, मनपा उपायुक्त पुष्पगंधा भगत, कौशल्य विकासचे सहायक आयुक्त सचिन जाधव, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे प्रकुलगुरू राजेश गडेवार, एम.एस. उडाशिवे, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक प्रशांत नाशिककर यांच्यासह इंजिनिअरिंग महाविद्यालयाचे प्राचार्य, सिमेंट कंपन्यांचे अधिकारी उपस्थित होते.

स्टार्टअप फेस्टिव्हलच्या आयोजनासंदर्भात सर्व संबंधित विभाग, संस्था आणि इतर घटकांसमवेत प्राथमिक स्वरूपात कार्यक्रमाची रूपरेषा याबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली. श्री. शंभरकर यांनी सांगितले की, उद्योजकांना नव्याने उद्योग सुरू करण्यासाठी वातावरण निर्मिती करावी. त्यांना आवश्यक त्या सोयी-सुविधा उपलब्ध करून देणे, गुंतवणूकदार, शिक्षणतज्ज्ञ यांच्या सहाय्याने नाविन्यपूर्ण प्रकल्प निर्मितीसाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. देशभरातील 100 नवउद्योजकांना आमंत्रित करण्यात येणार आहे. या फेस्टिव्हलमुळे जिल्ह्यातील नवउद्योजकांना चालना मिळणार आहे. यामुळे विविध नवनवीन कल्पना मांडाव्यात. स्टार्टअप फेस्टिव्हलमध्ये सहभाग वाढविण्यासाठी ऑनलाईन पोर्टल तयार करण्यात येणार आहे.

फेस्टिव्हल यशस्वी करण्यासाठी समिती स्थापन करून निधी उभारणी करण्यात येणार आहे. यामध्ये सीएसआर, बँक, शासकीय आणि अशासकीय संस्थांकडून उपलब्ध निधीद्वारे आर्थिक उभारणी करण्यात येणार आहे. कौशल्य विकास आणि नाविन्यपूर्ण प्रकल्प उभारण्यासाठी आर्थिक नियोजन, गुंतवणूकदारांचा सहभाग वाढविणे महत्वाचे असल्याचे श्री. शंभरकर यांनी सांगितले.

याशिवाय सोलापूर जिल्हा कृषी क्षेत्रामध्ये अग्रेसर असून कृषी उत्पादकाद्वारे प्रक्रिया उद्योग वाढविणे, आरोग्य क्षेत्रातही जिल्हा आरोग्य हब होत असल्याने औषध उद्योग वाढविणे यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना यावेळी मांडण्यात आल्या.यावेळी नागपूर जिल्ह्याने स्टार्टअपचे कशापद्धतीने नियोजन केल्याची माहिती सादरीकरणाद्वारे देण्यात आली.

Previous Post

जिल्ह्यातील 189 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर

Next Post

आज आणि उद्या 348 जागांसाठी ऑनलाईन रोजगार मेळावा

Related Posts

सोन पावलांनी गौराई सोबतच पावसाची हजेरी…!
मुख्य बातमी

सोन पावलांनी गौराई सोबतच पावसाची हजेरी…!

September 18, 2026
हिंजवडी-मान-मारुंजीतील रस्ते विकासाला गती; १ डिसेंबरपासून प्रत्यक्ष कामांना सुरुवात
मुख्य बातमी

हिंजवडी-मान-मारुंजीतील रस्ते विकासाला गती; १ डिसेंबरपासून प्रत्यक्ष कामांना सुरुवात

September 17, 2026
श्री चतुरबाई श्राविका प्राथमिक विद्यालय व बालमंदिर, सोलापूर इमारतीचा नूतनीकरण उद्घाटन सोहळा संपन्न
मुख्य बातमी

श्री चतुरबाई श्राविका प्राथमिक विद्यालय व बालमंदिर, सोलापूर इमारतीचा नूतनीकरण उद्घाटन सोहळा संपन्न

September 17, 2026
३३२ शिक्षकांना जागेवर नियुक्ती आदेश देत सोलापूर जिल्हा परिषदेच्या ‘सेवा संकल्प अभियानाला’ सुरुवात
मुख्य बातमी

३३२ शिक्षकांना जागेवर नियुक्ती आदेश देत सोलापूर जिल्हा परिषदेच्या ‘सेवा संकल्प अभियानाला’ सुरुवात

September 17, 2026
एक ही पात्र कारागीर प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेपासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्या-जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन
मुख्य बातमी

एक ही पात्र कारागीर प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेपासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्या-जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन

September 17, 2026
मतदार यादी पुनरीक्षणासाठी विशेष शिबिर…
मुख्य बातमी

मतदार यादी पुनरीक्षणासाठी विशेष शिबिर…

September 17, 2026
Next Post
आज आणि उद्या 348 जागांसाठी ऑनलाईन रोजगार मेळावा

आज आणि उद्या 348 जागांसाठी ऑनलाईन रोजगार मेळावा

ताज्या बातम्या

सोन पावलांनी गौराई सोबतच पावसाची हजेरी…!

सोन पावलांनी गौराई सोबतच पावसाची हजेरी…!

September 18, 2026
गणेशमूर्ती विक्रीत ‘उमेद’चा जलवा; महिला बचत गटांनी रचला १.६५ कोटींचा नवा विक्रम!

गणेशमूर्ती विक्रीत ‘उमेद’चा जलवा; महिला बचत गटांनी रचला १.६५ कोटींचा नवा विक्रम!

September 18, 2026
अरण हद्दीत भीषण अपघात; इर्टिगा कारची अज्ञात वाहनाला जोरदार धडक, चार तरुण गंभीर जखमी

अरण हद्दीत भीषण अपघात; इर्टिगा कारची अज्ञात वाहनाला जोरदार धडक, चार तरुण गंभीर जखमी

September 18, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026