• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Thursday, August 21, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

मुख्याध्यापकांनी दशसुत्रीची प्रभावी अंमलबजावणी करावी : दिलीप स्वामी

by Yes News Marathi
July 26, 2022
in इतर घडामोडी
0
मुख्याध्यापकांनी दशसुत्रीची प्रभावी अंमलबजावणी करावी : दिलीप स्वामी
0
SHARES
1
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

हर घर तिरंगा उपक्रमांत दिरंगाई नको

सोलापूर : मुख्याध्यापकांनी दशसुत्री ची प्रभावी अंमलबजावणी करावी. “हर घर तिरंगा “ उपक्रमांत दिरंगाई खपवून घेणार नाही. सोलापूर जिल्हा परिषदेचे सिईओ दिलीप स्वामी यांनी केले. सोलापूर येथे हुतात्मा स्मृती मंदिर येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील गुणवत्तावाढी दशसुत्री उपक्रमाच्या अंनललबजावणीसाठी कार्यशाळेचे आयोजन करणेत आले होते. या कार्यशाळेस. प्रमुख मार्गदर्शक म्हणून सिईओ स्वामी बोलत होते. मुख्याध्यापक व केंद्रप्रमुख यांना सविस्तर मार्गदर्शन केले.

यावेळी अक्कलकोट, दक्षिण सोलापूर व उत्तर सोलापूर या तीन तालुक्यातील मुख्याध्यापक उपस्थित होते. प्रारंभी क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांचे प्रतिमेचे पूजन सिईओ दिलीप स्वामी यांचे हस्ते करणेत आले. या वेळी विचार पीठावर दक्षिण सोलापूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी बाळासाहेब वाघ, उत्तर सोलापूर पंचायत समितीची गटविकास अधिकारी जश्मिन शेख, अक्कलकोट पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी कुदशिया शेख, दक्षिण सोलापूरचे गटशिक्षणाधिकारी मल्हारी बनसोडे, उत्तर सोलापूरचे गटशिक्षणाधिकारी बापूराव जमदार, विस्तार अधिकारी स्वाती स्वामी,हरिष राउत आदी उपस्थित होते.

संत सावता माळी हे पंढरीच्या वारीला गेले नाही. कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी” त्यांनी कामाला प्राधान्य दिले. स्वत विठ्ठल संत सावता माळी यांचे भेटीला जात.

विद्यार्थ्यांना स्वावलंबन शिकवा.
प्राथमिक शाळेत ज्ञानदान करणार्‍या शिक्षकांना समाजात आदराने गुरुजी या पदवीचे संबोधण्यात येते. गुरु शब्दाला जी फक्त शिक्षकांसाठीच लागला आहे. कुणी आयएएस अधिकारी झाला तरी कोणी त्यांच्या पदाच्या पुढे जी लावून त्यांना संबोधतीत नाहीत. केवळ पगारापुरते काम असे असे न करता सेवानिृवृत्ती नंतर समाजात भावी पिढी आदर देईल असे काम मनाने करा असे आवाहन जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी केले. यावेळी स्वामी म्हणाले, बदलत्या काळानुसार मुलांना शिक्षण देणे गरजेचे आहे. मुलांना केवळ पुस्तकी अभ्यासक्रमच न शिकवता भावी पिढी संस्कारी व्हावी अशी शिकवण गरजेचे आहे. काही वेळा मुले वाममार्गाकडे जात असताना दिसत असून काही शिक्षक गप्प बसण्याची भूमिका घेतात. यासाठी शिक्षण तज्ञ, मुख्याध्यापक, शिक्षक यांचे मत विचारात घेतच या तत्वाची अंमलबजावणी होण्यासाठी मी आग्रह करीत असल्याचे यावेळी स्वामी यांनी सांगितले.

दशसूत्री उपक्रमात गुणवत्तापुर्ण शिक्षण प्रदान करणे, स्पर्धात्मक व कौशल्याधारक, विध्यार्थी तयार करणे, आनंददायी, नाविन्यपुर्ण व रचनात्मक शिक्षण देणे, आरोग्यपुर्ण व मूल्यसंस्कारक्षम विध्यार्थी तयार करणे, तंत्रस्नेहीव आयटी क्षम विध्यार्थी तयार करणे, मुलांतील सुप्त गुणांस वाव देणे, लेखन, कवी निर्मिर्तीच्या माध्यमातून अभिव्यक्ती स्वातंत्र्यास प्रोत्साहित करणे,ज्ञानातील आधुनिकता, नवीन पध्दती ग्रहण करण्यासाठी शिक्षकांनी प्रयत्न करणे, मुलांत स्वावलंबनाची वृत्ती वाढवून, त्यांना देशभक्ती , मातृ-पितृ भक्ती शिकवणे, गुरुकुल पध्दतीला उजाळा देत शंभर टक्के शिक्षक व विध्यार्थी उपस्थिती वाढविणे हेच या उपक्रमाचे गमक असल्याचे स्वामी यांनी यावेळी सांगितले. 

साडेचार हजार मुली सायकलीविना..,!
………….
सोलापूर जिल्ह्सात साडेचार हजार मुलाींना पायी चालत शाळेत जावे लागते. यांना वेळेत सायकल उपलब्ध झाली नाही तर या मुली सायकली मुळे शिक्षणा पासून दूर राहतील. माझ्या मुलींना सायकली द्या असे मी प्रत्येकांना आवाहन करतो. पाचशे पेक्षा अंधुक मुलींना सायकली मिळाल्या. बालाजी अमायन्स चे उद्योजक राम रेड्डी यांनी ५० सायकली दान देण्याची ग्वाही दिली आहे. निमगाव शाळेने सुरू केलेला उपक्रम दिशा दर्शक ठरत असला तरू मदतीची आवश्यकता आहे. मुख्याध्यापक यांनी पुढाकार घ्यावा. असे भावनिक आवाहन सिईओ दिलीप स्वामी यांनी केले.

मुख्याधायपक व केंद्रप्रमुखांचा उस्फुर्त प्रतिसाद
……..
सिईओ दिलीप स्वामी यांनी १ तास २५ मिनिटे दशसुत्रीचे सादरीकरण् केले. कधी संताचे विचार तर कधी संत कबीरांचे दोहे तर कधी बहिणाबाईचा कविता सांगत सिईओ स्वामी यांनी केंद्र प्रमुख व मुख्याधायपक यांना दीड तास जागेवर खिळवून वुचारमंथन केले. या उपक्रमावे मुख्याध्यापक भारावून गेले होते. जिल्ह्सात शैक्षणिक क्राती साठी दशसुत्री हे विधायक पाऊस असल्याचे मुख्याध्यारक यांनी सांगितले.

हर घर तिरंगा “ उपक्रमांत दिरंगाई नको – सिईओ स्वामी

देशा साठी व देश प्रेमा साठी ग्रामस्थ व मुलांमध्ये जागृती करून हर घर तिरंगा उपक्रम लोकां पर्संत पोहचवा. हर घर तिरंगा “ उपक्रमांत दिरंगाई खपवून घेणार नाही. सोलापूर जिल्हा परिषदेचे सिईओ दिलीप स्वामी यांनी केले.
सर्व शासकीय कार्यालये, शाळा , घरे यांचेवर तिरंगा ध्वज येत्या ११ आॅगष ते १७ आॅगष्ट या कालावधीत हा उपक्रम राबवा असे आवाहन केले. याचे सुक्ष्म नियोजन करा. असेही त्यांनी सांगितले.

Previous Post

राज्यसभेत गोंधळ : तृणमूलच्या सात जणांसह १९ खासदारांचं निलंबन

Next Post

शिंदे सरकारचा निर्णयांचा धडाका; 24 दिवसात तब्बल 538 शासन आदेश

Next Post
शिंदे सरकारचा निर्णयांचा धडाका; 24 दिवसात तब्बल 538 शासन आदेश

शिंदे सरकारचा निर्णयांचा धडाका; 24 दिवसात तब्बल 538 शासन आदेश

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group