सोलापूर- प्रिसिजन कंपनीने अगदी प्रारंभापासूनच पर्यावरण पूरक उत्पादन पद्धती अवलंबली आहे. कंपनीच्या चिंचोली प्लांटमध्ये ४५ एकरावरील हिरवागार निसर्ग हाच पर्यावरण प्रेमाची साक्ष देतो आहे.. दिनांक ५ जून च्या जागतिक पर्यावरण दिनानिमित्त कंपनीत विविध उपक्रम राबविण्यात आले. यात पर्यावरण रक्षण, संवर्धन याविषयी जागरूकता निर्माण करणे, ” द ओन्ली वन अर्थ” असे यावर्षीच्या पर्यावरण दिनाच्या घोषवाक्य आहे… त्याबाबत माहिती देणे, वृक्षारोपण करणे आदी कार्यक्रमांचा समावेश होता.
कंपनीचे सेफ्टी ऑफिसर सुहास पाटील, प्रशासन विभाग प्रमुख सिद्धेश्वर चंदनशिवे, दीपक राजपूत आदींनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. त्यांना मनुष्यबळ विभाग प्रमुख संजीव माळवदकर आणि सर व्यवस्थापक राजकुमार काशीद यांनी मार्गदर्शन केले..
यावेळी कंपनीचे सर्व वरिष्ठ व्यवस्थापक, विभाग प्रमुख उपस्थित होते.