येस न्युज मराठी नेटवर्क : आज स्वराज्यासाठी बलिदान दिलेले शूरवीर मावळे शिवबा काशीद यांच्या जयंतीनिमित्त पंढरीतील हेअर सलून कारागीर माऊली चव्हाण यांनी वीर शिवबा काशीद यांची प्रतिमा केशरचनेत हुबेहूब रेखाटली आहे.पंढरीतील माऊली चव्हाण या पंढरीतील हरहुन्नरी हेअर सलून कलाकाराने आपली कला सातासमुद्रापार पोहचवलीय. आजतागायत त्यांनी आपल्या अंगी असलेल्या कलेद्वारे छत्रपती शिवाजी महाराज,राजमाता अहिल्यादेवी होळकर, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर अशा विविध महापुरुषांचे चित्रं सुबकपणे रेखाटले आहे. आजही त्यांनी आपल्या हातातील कलेचा गौरवास्पद वापर करत शहर मावळे वीर शिवबा काशीद यांची हुबेहुब प्रतिमा साकारून सर्वत्रं वाहवा मिळवलीय.
माऊलीच्या हातातील जादू अनुभवण्यासाठी पंढरीतील नवीन बसस्थानकासमोरील ज्ञानेश्वर नगर शॉपींग सेंटर मधील त्यांचे ‘फ्रेन्डशिप मेन्स पार्लर’ मध्ये नेहमीच ग्राहकांची वर्दळ असते.