• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

तृतीयपंथीयांचे नाव मतदार यादीत नोंदविण्यासाठी त्यांच्या गुरूंनी सहकार्य करावे – श्रीकांत देशपांडे

Yes News Marathi by Yes News Marathi
April 6, 2022
in मुख्य बातमी
0
तृतीयपंथीयांचे नाव मतदार यादीत नोंदविण्यासाठी त्यांच्या गुरूंनी सहकार्य करावे – श्रीकांत देशपांडे
0
SHARES
1
VIEWS

मुंबई : देशातील प्रत्येक नागरिकांस मतदानाचा अधिकार असून तेवढाच अधिकार तृतीयपंथीय समाजाला पण आहे. मतदान प्रक्रियेत तृतीयपंथियांनी संघटितपणे सहभाग घेतल्यास त्यांना मतदानाचा अधिकार प्राप्त होईल. आजमितीस राज्याच्या मतदार यादीत केवळ 3 हजार 700 व्यक्तींनी तृतीयपंथीय म्हणून नोंदणी केली आहे. मतदार यादीत राज्यातील सर्व तृतीयपंथीय समाजाने नोंदणी करावी, यासाठी तृतीयपंथीयांच्या गुरूंनी सहकार्य करावे, असे आवाहन राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी तथा प्रधान सचिव श्रीकांत देशपांडे यांनी आज केले.

        मुंबईतील भायखळा येथे तृतीयपंथीयांच्या गुरूंच्या वसाहतीत जाऊन मुख्य निवडणूक अधिकारी श्री.देशपांडे यांनी भेट दिली. यावेळी मुंबई शहर जिल्हाधिकारी राजीव निवतकर, उपजिल्हाधिकारी माधव पाटील, तृतीयपंथीयांचे गुरू, मुंबई किन्नर ट्रस्ट, किन्नर मॉ संस्थेचे सदस्य आदी उपस्थित होते.

        तृतीयपंथीयांचे प्रश्न, त्यांच्या समस्या भिन्न असून त्याबाबत राज्यातील सर्व शासकीय अधिकाऱ्यांना त्याची माहिती असायला हवी. यासाठी राज्यभरातील तृतीयपंथीयांचे गुरू, शासकीय अधिकारी, शासकीय विभाग, स्वयंसेवी संस्था यांची राज्यस्तरीय परिषद घेण्यासंदर्भात विचार सुरू आहे. तृतीयपंथीयांच्या विविध समस्यांचा अभ्यास करून त्याबाबतचा अहवाल शासकीय अधिकाऱ्यांना एकत्रितपणे सादर करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांकरिता फेलोशिप देण्याबाबत विचार करण्यात येत असल्याचे श्री.देशपांडे यांनी यावेळी सांगितले. आजच्या घडीला तृतीयपंथीयांची मतदार यादीतील नोंदणी अल्प असल्याने त्यांना त्यांचे अधिकार मिळण्यात अडचणी येत आहेत. महाराष्ट्रात जवळपास 10 लाख तृतीयपंथी असून या सर्वांना मतदानाचा अधिकार मिळाल्यास त्यांना येत असलेल्या समस्या सहज दूर होऊ शकतील, असे मतही श्री.देशपांडे यांनी व्यक्त केले.

        तृतीयपंथीयांचे नाव मतदार यादीत नोंदण्यासाठी शासन विशेष प्रयत्न करत असून मुंबई शहरात त्यांच्या निवासाजवळ शिबिरे आयोजित करण्यात येत आहेत. ज्या तृतीयपंथीय व्यक्तींनी आपल्या नावाची नोंद तृतीयपंथी म्हणून केली नसेल, तर अशानींही आपल्या मतदान कार्डात तृतीयपंथी म्हणून बदल करावा, असे आवाहनही श्री.देशपांडे यांनी यावेळी केले.

        मुंबई जिल्हाधिकारी श्री. निवतकर यावेळी म्हणाले,  संपूर्ण राज्यात तृतीयपंथी हा वंचित घटक असून त्यांना मतदान करण्याचा अधिकार प्राप्त व्हावा, यासाठी सर्व तृतीयपंथीयांच्या नावाची नोंदणी मतदार यादीत असावी, याबाबतचे सर्वेक्षण सुरू आहे. या मतदान कार्डामुळे आपणास मतदानाच्या पवित्र अधिकाराबरोबर वेगवेगळ्या सोयीसुविधा मिळण्यास मदत होणार आहे. यासाठी सर्व तृतीयपंथीयांनी मतदान कार्ड प्राप्त करून घेण्यासाठी जिल्हा निवडणूक कार्यालयाकडे नोंदणी करावी, असे आवाहन निवतकर त्यांनी केले.
Previous Post

डेब्रिज काढण्याची आणि नालेसफाईची कामे 31 मे पर्यंत पूर्ण करा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Next Post

सोलापूर जिल्ह्यात दहा दिवस भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता कार्यक्रम

Related Posts

बालाजी अमाईन्सच्यावतीने पूर्व विभाग सार्वजनिक वाचनालयास स्पर्धा परिक्षा पुस्तकांची भेट
मुख्य बातमी

बालाजी अमाईन्सच्यावतीने पूर्व विभाग सार्वजनिक वाचनालयास स्पर्धा परिक्षा पुस्तकांची भेट

October 27, 2026
सोमवारी जिल्हास्तरीय लोकशाही दिन
मुख्य बातमी

सोमवारी जिल्हास्तरीय लोकशाही दिन

October 27, 2026
आजचे मंत्रिमंडळ निर्णय
मुख्य बातमी

आजचे मंत्रिमंडळ निर्णय

October 27, 2026
सोलापुरात रस्त्यावर पाण्याची प्रचंड नासाडी, अधिकाऱ्यांचा गलथानपणा..!
मुख्य बातमी

सोलापुरात रस्त्यावर पाण्याची प्रचंड नासाडी, अधिकाऱ्यांचा गलथानपणा..!

October 27, 2026
पालकमंत्री म्हणाले,आता काँग्रेस विरोधात भाजप आंदोलन करणार…!
मुख्य बातमी

पालकमंत्री म्हणाले,आता काँग्रेस विरोधात भाजप आंदोलन करणार…!

October 26, 2026
सोलापूर जिल्ह्यातील 165 गावांना 178 टँकरद्वारे पाणीपुरवठा
मुख्य बातमी

सोलापूर जिल्ह्यातील 165 गावांना 178 टँकरद्वारे पाणीपुरवठा

October 26, 2026
Next Post
सोलापूर जिल्ह्यात दहा दिवस भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता कार्यक्रम

सोलापूर जिल्ह्यात दहा दिवस भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता कार्यक्रम

ताज्या बातम्या

चारा टंचाईवर मात करण्यासाठी शंभर टक्के अनुदानावर मोफत चारा बियाणे वाटप

चारा टंचाईवर मात करण्यासाठी शंभर टक्के अनुदानावर मोफत चारा बियाणे वाटप

October 27, 2026
ग्रामीण कुटुंबांना वर्षभरात १२५ दिवसांच्या रोजगाराची वैधानिक हमी

ग्रामीण कुटुंबांना वर्षभरात १२५ दिवसांच्या रोजगाराची वैधानिक हमी

October 27, 2026
अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती अर्ज तात्काळ सादर करा

अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती अर्ज तात्काळ सादर करा

October 27, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026