• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

गुरू शिष्य परंपरा सनातन आहे : श्री काशी जगद्गुरू

Yes News Marathi by Yes News Marathi
April 5, 2022
in मुख्य बातमी
0
गुरू शिष्य परंपरा सनातन आहे : श्री काशी जगद्गुरू
0
SHARES
0
VIEWS

पट्टाभिषेकाच्या एक्केचाळीस दिवसाच्या अनुष्ठानाचा शुभारंभ

वाराणसी : भारतीय संस्कृतीमध्ये गुरू शिष्य परंपरा अत्यंत महत्त्वाची आहे. ही परंपरा अनादी काळापासून सुरू आहे. अनंत कालापर्यंत राहणार आहे. जगाला अपूर्व ज्ञान देण्यासाठी भगवान शंकरांनी आपल्या श्वासोच्छवासातून चार वेद आणि वैखरीच्या उपदेशातून अठ्ठावीस आगमांची निर्मिती केली. भारतीय ज्ञानपरंपरेमध्ये वेद आणि आगमच महत्त्वाचे मानले जातात. आपल्या देशामध्ये जेवढी गुरू-शिष्य परंपरा आहे या सर्वांचे आदिगुरू शिवालाच मानले जाते. शिवाच्या पंचमुखातून प्रकट झालेले जगद्गुरू पंचाचार्यांनी या भूलोकात लिंगात अवतार घेऊन सनातन वीरशैव धर्माची स्थापना केली. पंचाचार्यांनी सर्वांना शिवाचे ज्ञान पोहोचवण्यासाठी प्रत्येक प्रांतामध्ये आपल्या अनेक शाखा मठांची स्थापना केली.

परशिवाचे परमज्ञान सामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्याचे कार्य केले. काशीपीठसुद्धा अनादिकालापासून हे परमज्ञान सामान्य लोकांना देत आले आहे. हे कार्य निरंतर सुरू आहे. देवासमोर आपण अखंड ज्योत लावतो तसेच काशीपीठामध्ये ज्ञानाची अखंड ज्योत सनातन काळापासून सुरू आहे. अनंत कालापर्यंत चालत राहणार आहे. काशीपीठाची ज्ञानदान परंपरा निरंतर चालावी म्हणून आपल्या उत्तराधिकाराऱ्याचे पट्टाभिषेक करीत आहोत असे विचार काशी जगद्गुरू डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी यांनी आपल्या आशिर्वचनात सांगितले. काशीपीठामध्ये नूतन पट्टाभिषेकाच्या निमित्ताने एक्केचाळीस दिवसाच्या अनुष्ठानाच्या शुभारंभादिवशी दिव्य सान्निध्यस्थानी आशीर्वचन सांगताना हे विचार मांडले.

या उद्घाटन समारंभामध्ये माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर, भारताचे उद्योगपती श्री. बाबासाहेब कल्याणी, केंद्रीय मंत्री भगवंत खुबा, गुलबर्गाचे खासदार उमेश जाधव, उद्योगपती धर्मराज खेणी, प्रसिद्ध हृदय रोग तज्ज्ञ डॉ. जगदीश हिरेमठ आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन अब्बेतुमकुरचे श्री ष.ब्र.डाॅ. गंगाधर शिवाचार्य स्वामी यांनी पंचाचार्य ध्वजारोहण आणि दीपप्रज्वलन करून केले.

महास्वामीजींच्या दिव्य सान्निध्यात आणि काशीपीठाचे उत्तराधिकारी डॉ. मल्लिकार्जुन शिवाचार्य स्वामीजी यांच्या नेतृत्वात झालेल्या या कार्यक्रमामध्ये अनेक मान्यवरांना पदवी देऊन गौरविण्यात आले. डॉ. गंगाधर शिवाचार्य यांना ‘शिष्यहृत्पद्मभास्कर:’, बाबा कल्याणी यांना ‘उद्यमरत्न’, भगवंत खुबा यांना ‘समाजसेवा भूषण’, शिवराज पाटील यांना ‘समाजसेवा रत्न’, धर्मराज खेणी यांना ‘धर्मभूषण’, डॉ. संगमेश सौंदत्तीमठ यांना ‘साहित्य भूषण’, पंढरपूरचे सुभाष सिद्राम म्हमाणे यांना ‘दान चिंतामणी’, पुण्याचे सुप्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉ. जगदीश हिरेमठ ‘वैद्यरत्न’ , बसवराज पाटील ‘धर्मभूषण’ अशा पदव्या देऊन गौरविण्यात आले. या सन्मानाला उत्तर देताना सर्व मान्यवरांनी काशीपीठ आणि जगदगुरू यांच्याविषयी ऋण व्यक्त केले.

सकाळी सात पंचेचाळीसला अखंड दीपप्रज्वलन करून काशी जगद्गुरू आणि उत्तराधिकारी या दोघांनी रुद्राभिषेकाचा प्रारंभ केला. शादनगर गुरुकुलच्या पस्तीस विद्यार्थांनी अतीरुद्राचा शुभारंभ केला. दुपारी सर्वांनी महाप्रसाद घेतला. कार्यक्रमाच्या प्रारंभी गुरुकुलचे वेद प्रा. मल्लिकार्जुन शास्त्री यांनी वेदघोष केला. बार्शी दहिवडकर मठाचे मठाधिपती श्री ष. ब्र. गुरुसिद्ध मणिकंठ शिवाचार्य यांनी मंगलस्तोत्र गायले. या कार्यक्रमाला पुण्याच्या विश्वेश्वर सहकारी बँकेचे अध्यक्ष अनिल भरतशेठ गाढवे, ज्येष्ठ संचालक सुनील रुकारी यांच्यासह सर्व संचालक तसेच महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र आणि भारतातील विविध प्रांतातील हजारो भक्तगण, काशीपीठाचे वीरशैव विद्वत् संघाचे सर्व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन पुण्याचे पत्रकार श्री विद्याधर ताठे यांनी केले.

Previous Post

बंदूक लावा, हत्या करा, घाबरणार नाही : संजय राऊत

Next Post

वाझे आणि अनिल देशमुखांच्या दोन माजी सहकाऱ्यांना ११ एप्रिलपर्यंत CBI कोठडी

Related Posts

वर्षभरात सोलापुरातून तब्बल 35 हजार 902 प्रवाशांनी केला विमान प्रवास…!
मुख्य बातमी

वर्षभरात सोलापुरातून तब्बल 35 हजार 902 प्रवाशांनी केला विमान प्रवास…!

June 9, 2026
सोलापूरच्या विमानसेवेची आज वर्षपूर्ती : हवाई मंत्र्यांचे ते आश्वासन ‘हवेतच’….!
मुख्य बातमी

सोलापूरच्या विमानसेवेची आज वर्षपूर्ती : हवाई मंत्र्यांचे ते आश्वासन ‘हवेतच’….!

June 9, 2026
TOP 25 । पालकमंत्र्यांच्या आवाहनाला खासदार प्रणिती शिंदे यांनी केला विरोध…!
मुख्य बातमी

TOP 25 । पालकमंत्र्यांच्या आवाहनाला खासदार प्रणिती शिंदे यांनी केला विरोध…!

May 29, 2026
अन्न व औषध प्रशासन आयुक्त पदाचा पदभार स्वीकारताच तुकाराम मुंढे यांच्याकडून राज्यात 53 ठिकाणी धाडी…
मुख्य बातमी

अन्न व औषध प्रशासन आयुक्त पदाचा पदभार स्वीकारताच तुकाराम मुंढे यांच्याकडून राज्यात 53 ठिकाणी धाडी…

May 29, 2026
TOP 25 – सोलापूर विद्यापीठाने आचारसंहितेचे नियम बसविले ‘धाब्यावर’…!
मुख्य बातमी

TOP 25 – सोलापूर विद्यापीठाने आचारसंहितेचे नियम बसविले ‘धाब्यावर’…!

May 28, 2026
TOP 25 । सोलापुरातील 150 कोटीच्या घोटाळ्यातील अहवाल मंत्रालयात पडून…!
मुख्य बातमी

TOP 25 । सोलापुरातील 150 कोटीच्या घोटाळ्यातील अहवाल मंत्रालयात पडून…!

May 26, 2026
Next Post
वाझे आणि अनिल देशमुखांच्या दोन माजी सहकाऱ्यांना ११ एप्रिलपर्यंत CBI कोठडी

वाझे आणि अनिल देशमुखांच्या दोन माजी सहकाऱ्यांना ११ एप्रिलपर्यंत CBI कोठडी

ताज्या बातम्या

महामार्ग संलग्न अपघात प्रवण क्षेत्राच्या ठिकाणी तात्काळ उपाययोजना कराव्यात -जिल्हाधिकारी कार्तीकेयन एस.

महामार्ग संलग्न अपघात प्रवण क्षेत्राच्या ठिकाणी तात्काळ उपाययोजना कराव्यात -जिल्हाधिकारी कार्तीकेयन एस.

June 16, 2026
राज मेमोरियल इंग्लिश स्कूलमध्ये ढोल-ताशांच्या गजरात प्रवेश उत्सव

राज मेमोरियल इंग्लिश स्कूलमध्ये ढोल-ताशांच्या गजरात प्रवेश उत्सव

June 15, 2026
ढोल-ताशांच्या गजरात नव्या शैक्षणिक वर्षाचे स्वागत; उमाबाई श्राविका विद्यालयात प्रवेशोत्सव

ढोल-ताशांच्या गजरात नव्या शैक्षणिक वर्षाचे स्वागत; उमाबाई श्राविका विद्यालयात प्रवेशोत्सव

June 15, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मॅच रिपोर्ट: साऊथ सोलापूर ब्लूचा दिमाखदार विजय

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026