• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

वटवृक्ष मंदिरात समर्थांचा प्रकट दिन सोहळा भक्तीभावाने साजरा

Yes News Marathi by Yes News Marathi
April 3, 2022
in इतर घडामोडी
0
वटवृक्ष मंदिरात समर्थांचा प्रकट दिन सोहळा भक्तीभावाने साजरा
0
SHARES
2
VIEWS

 येस न्युज मराठी नेटवर्क : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान [मुळस्थान] अक्कलकोट येथे श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकटदिन सोहळा हजारो भाविकांच्या उपस्थितीत मोठ्या भक्तीभावाने व अपार श्रद्धेने पार पडला. रविवार दिनांक ३/४/२०२२ रोजी स्वामी प्रकटदीन रोजी पहाटे ५ वाजता श्रींची काकड आरती मंदिराचे पुजारी मोहन महाराज यांच्या हस्ते व समितीचे चेअरमन महेश इंगळे यांच्या उपस्तिथीत करण्यात आली. त्यानंतर स्वामी भक्तांच्या गर्दीमुळे स्वामींचे दर्शन भाविकांना सुलभतेने होणेकरिता सर्व स्वामी भक्तांना टप्प्या टप्प्याने दर्शनास सोडण्यात आले. सकाळी १० ते १२ या वेळेत ज्योतिबा मंडपात देवस्थानचे विश्वस्ता उज्वलाताई सरदेशमुख व सहकाऱ्यांचे सत्संग महिला भजनी मंडळ अक्कलकोट यांच्या वतीने भजन होऊन गुलाल पुष्प वाहण्यात आले, त्यानंतर पाळणा कार्यक्रम संपन्न झाला. यानंतर मंदिर समिती चेअरमन महेश इंगळे यांच्या हस्ते व मोहन महाराज पुजारी, मंदार महाराज पुजारी यांच्या वतीने आरती करण्यात आली. अशा प्रकारे भजनगीत, पाळणा व आरती होऊन स्वामींचा जन्मोत्सव साजरा झाला. स्वामी प्रकट दिनानिमित्त आज वटवृक्ष मंदिरात देवस्थानच्या वतीने नैवेद्य आरतीनंतर सर्व स्वामी भक्तांना शिरा प्रसाद वाटप करण्यात आले. 

मंदीरात भाविकांच्या वतीने होणाऱ्या संकल्पित अन्नदानच्या माध्यमातून दुपारी १२ ते ३ या वेळेत देवस्थानच्या मैंदर्गी-गाणगापूर रोडवरील देवस्थानच्या भक्त निवास भोजनकक्ष येथे उपस्थित सर्व स्वामी भक्तांना स्वामी प्रसाद म्हणून देण्यात आलेले भोजन प्रसाद ग्रहण करून हजारो स्वामी भक्त तृप्त झाले. भाविकांनी स्वामी दर्शन व भोजन महाप्रसादाची तृप्ती अनुभवल्यानंतर दुपारी १२ ते १ व सायंकाळी ४ ते ६ या वेळेत सोलापूरचे प्रसिद्ध सुंद्री वादक भीमण्णा जाधव यांचा सुंद्री वादनाच्या व सोलापूरच्या व्यंकटेश संगीत विद्यालयाच्या विद्यार्थिनी रसिका / सानिका कुलकर्णी यांचा शास्त्रीय राग गायनाचा सुमधुर भावभक्तिगीतांच्या गायन सेवेने उपस्थित भाविकांचा स्वामी प्रकट दिनाचा आनंद द्विगुणित झाला. स्वामी प्रकट दिनानिमित्त देवस्थाने रक्तदान शिबीरांच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकीही जोपासली आहे. देवस्थानच्या रक्तदान शिबिराच्या माध्यमातून १२८ रक्तदात्यांनी रक्तदान करून रुग्णसेवेतून समाज सेवेत सहभाग नोंदविला. गुढी पाडवा, शनिवार, रविवारच्या सलग सुट्टयांमुळे दिवसभरात हजारो स्वामी भक्तांनी स्वामींचे दर्शन घेतले.  आज स्वामी प्रकट दिनानिमीत्त तालुक्याचे माजी आमदार सिध्दाराम म्हेत्रे, अक्कलकोट संस्थानचे मालोजीराजे भोसले राजेसाहेब व कुटूंबीय, सोलापूर ग्रामीणचे अप्पर पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव व कुटुंबीय, अतिरिक्त जिल्हाधिकारी संजीव जाधव, तहसीलदार बाळासाहेब शिरसाट, उपविभागीय पोलिस अधिकारी राजेंद्रसिंह गौर, पोलीस निरीक्षक जितेंद्र कोळी, प्रशिक्षित सहाय्यक पोलीस अधीक्षक आश्विन कार्तिक (आयपीएस), औरंगाबादचे उद्योजक राजसिंह दर्डा, पनवेलचे उद्योजक कपिल पाटील, अहमदनगरचे वैद्य जीवन कटारिया, पुण्याचे उद्योगपती प्रथमेश देशमुख आदी मान्यवरांसह हजारो स्वामी भक्तांनी श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले. कोरोनाच्या विघ्नामुळे आज दोन वर्षानंतर स्वामी समर्थांचे मूळस्थान असलेल्या वटवृक्ष मंदिरात उपस्थित राहून स्वामी प्रकट दिन सोहळ्याचा साक्षीदार या जन्मी पुन्हा होता आल्याने अनेक निस्सीम स्वामी भक्तांच्या नयनात आनंदाश्रू तरळले. भाविकांना सुरक्षितपणे दर्शन घेण्याकामी व प्रसंगानुरुप योग्य ते मार्गदर्शन करण्याकामी मंदिर समितीचे चेअरमन व नगरसेवक महेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, संपतराव शिंदे, दयानंद हिरेमठ, उज्वलाताई सरदेशमुख, श्रीशैल गवंडी, श्रीनिवास इंगळे, स्वामलिंग कांबळे, बंडेराव घाटगे, बाळासाहेब घाटगे, अक्षय सरदेशमुख, श्रीपाद सरदेशमुख, शिवशरण अचलेर, प्रसाद सोनार, ज्ञानेश्वर भोसले, संतोष जमगे, स्वामीनाथ लोणारी, संजय पवार, अमर पाटील, महादेव तेली, संजय पाठक, सागर गोंडाळ, गिरीश पवार, दीपक जरीपटके, रवि मलवे, मंगेश फुटाणे, शंकर पवार, अरविंद कोकाटे, बसवराज आलमद, सातलिंगप्पा आलमद, लखन गवळी, श्रीकांत मलवे आदींसह मंदिर समितीचे अन्य कर्मचारी सेवेकऱ्यांनी परिश्रम घेतले. आज स्वामी प्रकटदिना निमित्त पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली अक्कलकोटचे उपविभागीय पोलिस अधिकारी राजेंद्रसिंह गौर व पोलीस निरीक्षक जितेंद्र कोळी यांनी मंदिर समिती व परिसरास चोख बंदोबस्त पुरवून विशेष सहकार्य केले.

Previous Post

अक्कलकोट मध्ये ५५ हजार स्वामी भक्तांनी घेतला महाप्रसादाचा लाभ

Next Post

श्री महालक्ष्मी मंदिरात दीपोत्सव आणि आरती उत्साहात साजरी

Related Posts

ऊसाला ३५०१ रुपये पहिली उचल द्या; अन्यथा गव्हाण बंद आंदोलन
इतर घडामोडी

ऊसाला ३५०१ रुपये पहिली उचल द्या; अन्यथा गव्हाण बंद आंदोलन

October 28, 2026
कौस्तुभ गावडे यांच्या विजयाचा भाजपकडून दुष्काळसदृश परिस्थितीमुळे साधेपणाने विजय साजरा
इतर घडामोडी

कौस्तुभ गावडे यांच्या विजयाचा भाजपकडून दुष्काळसदृश परिस्थितीमुळे साधेपणाने विजय साजरा

October 28, 2026
आंतरजिल्हा बोगस मॅट्रिमोनी रॅकेटचा सोलापुरात पर्दाफाश
इतर घडामोडी

आंतरजिल्हा बोगस मॅट्रिमोनी रॅकेटचा सोलापुरात पर्दाफाश

October 27, 2026
सोमाणी ह्युंदाई, सोलापूर येथे नवीन Hyundai Bayon कारचे शानदार लॉन्चिंग…!!!!
इतर घडामोडी

सोमाणी ह्युंदाई, सोलापूर येथे नवीन Hyundai Bayon कारचे शानदार लॉन्चिंग…!!!!

October 27, 2026
चारा टंचाईवर मात करण्यासाठी शंभर टक्के अनुदानावर मोफत चारा बियाणे वाटप
इतर घडामोडी

चारा टंचाईवर मात करण्यासाठी शंभर टक्के अनुदानावर मोफत चारा बियाणे वाटप

October 27, 2026
ग्रामीण कुटुंबांना वर्षभरात १२५ दिवसांच्या रोजगाराची वैधानिक हमी
इतर घडामोडी

ग्रामीण कुटुंबांना वर्षभरात १२५ दिवसांच्या रोजगाराची वैधानिक हमी

October 27, 2026
Next Post
श्री महालक्ष्मी मंदिरात दीपोत्सव आणि आरती उत्साहात साजरी

श्री महालक्ष्मी मंदिरात दीपोत्सव आणि आरती उत्साहात साजरी

ताज्या बातम्या

पशुधनाची ‘भारत पशुधन’ प्रणालीवर नोंदणी अनिवार्य …!

पशुधनाची ‘भारत पशुधन’ प्रणालीवर नोंदणी अनिवार्य …!

October 29, 2026
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात सरसकट 5 हजार रुपये जमा होणार; सर्व जाचक अटी रद्द…

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात सरसकट 5 हजार रुपये जमा होणार; सर्व जाचक अटी रद्द…

October 29, 2026
भाजपला नडला ओव्हर कॉन्फिडन्स…! बदलावी लागणार रणनीती..

भाजपला नडला ओव्हर कॉन्फिडन्स…! बदलावी लागणार रणनीती..

October 29, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026