येस न्युज नेटवर्क : आयपीएलच्या पंधराव्या हंगामाला काहीच दिवस शिल्लक राहिले असताना क्रिकेट चाहत्यांना निराश करणारी माहिती समोर आलीय. चीन, दक्षिण कोरियासह युरोपियन देशात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं महाराष्ट्रालाही सतर्क राहण्याचा इशारा दिलाय. महाराष्ट्र सरकारनं याआधी 25 टक्के प्रेक्षकांसह आयपीएलच्या लढती खेळण्यास परवानगी दिली होती. पण येत्या काळात कोरोनाचा संसर्ग वाढल्यास राज्य सरकारकडून परवानगी रद्द केली जाऊ शकते. यामुळं आयपीएलचा पुढचा हंगामाही प्रेक्षकांविना खेळला जाणार असल्याची भिती व्यक्त केली जात आहे. यंदा आयपीएलमधील सर्व साखळी सामने मुंबई, नवी मुंबई आण पुण्यात खेळवले जाणार आहेत.
चीन आणि कोरिया यांसह अनेक देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत पुन्हा वाढ होऊ लागलीय. ज्यामुळे पुन्हा एकदा संपूर्ण जगावर चिंताचे वातावरण निर्माण झालंय. याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं महाराष्ट्राला पुढील धोक्याबाबत अलर्ट केलंय. आयपीएलचे सामने पाहण्यासाठी जगभरातून प्रेक्षक येत असतात. यामुळं कोरोनाचा संसर्ग वाढण्याची शक्यता आहे. हा धोका टाळण्यासाठी यंदाही आयपीएलचे सर्व सामने प्रेक्षकांविना खेळवले जाण्याची भिती व्यक्त केली जात आहे.

