सोलापूर : महाराष्ट्रात प्रथमच सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने वारांगन व तृतीयपंथी यांना स्वाभिमानाने स्वतःच्या पायावर उभे करून त्यांना कायमस्वरूपी रोजगार देण्याच्या उद्देशाने आज देशात सोलापूर महानगरपालिकेच्या माध्यमातून प्रथमच स्वाभिमानी रोजगार पॅटर्न राबविण्यात आला.आज सोलापूर बायोएनर्जी प्लांट तुळजापूर रोड येथे सोलापूर महानगरपालिका, सोलापूर, पोलीस आयुक्तालय सोलापूर, सोलापूर बायो एनर्जी सिस्टीम प्रा. लि., सोलापूर व क्रांती महिला संघ सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने महिला सशक्तीकरण, सबलीकरण व रोजगार कार्यक्रम आणि माझी वसुंधरा आंतर्गत वृक्षारोपण कार्यक्रम आयोजन करण्यात आले आहे.यावेळी सहायक आयुक्त विक्रम पाटील,सोलापूर बायोएनर्जी प्लांटचे डायरेक्टर श्री. सारंग भांड , महिला क्रांती संघ चे उपाध्यक्ष सौ. रेणुका जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.या कार्यक्रमाचे उदघाटन पोलीस आयुक्त हरीश बैजल त्यांच्या शुभहस्ते तर महापालिका आयुक्त तथा प्रशासक पि. शिवशंकर,उपायुक्त धनराज पांडे यांच्या प्रमुख उपस्थिती करण्यात आले.यावेळी बायो एनर्जी सिस्टीम येथे काम करत असलेल्या महिलांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर बायो एनर्जी प्लांट येथे वृक्षारोपण करण्यात आले.सहानभूती अथवा तात्पुरती मदत करण्या ऐवजी वारांगणा व तृतीयपंथीयांना स्वाभिमानाने स्वतःच्या पायावर उभा करून त्यांना कायमस्वरूपी रोजगार देण्याच्या उद्देशाने स्वाभिमानी रोगजार पॅटर्न राबविण्यात आले. देशात महानगरपालिकेच्या माध्यमातून प्रथमच असं अभिनव पॅटर्न राबविण्यात येत आहे. त्यांना कायमस्वरूपी रोजगार देण्याच्या उद्देशाने भोगाव येथील बायोएनर्जी सिस्टीम प्रा लि च्या माध्यमातून वारांगणा व तृतीयपंथीयांना रोगजार देण्यात आले.तुळजापूर रोडवरील कचरा डेपोच्या जागेवर सोलापूर बायोएनजी सिस्टीम प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी कचऱ्यावर प्रक्रिया करून वीजनिर्मितीचे काम करते. याठिकाणी महिला आणि तृतीयपंथीयांना रोजगार उपलब्ध करून देण्यात आले.पहिल्या टप्प्यात बारा तृतीयपंथीयांची निवड करण्यात आली आहे. या सर्वांना किमान वेतनाच्या आधारावर बायोएनजो कंपनी दरमहा वेतन देणार आहे. सोलापुरातील क्रांती महिला संघाने महापालिकेला पन्नास तृतीयपंथीयांची यादी उपलब्ध करून दिली होती. त्यापैकी कामाची गरज असलेल्या आणि किमान कौशल्याच्याआधारावर बाराजणांची निवड करण्यात आली. या सर्वांना कामाचे प्रशिक्षण देण्यात आले. तुळजापूर रोडवरील कचरा डेपो येथे बायोएनजी कंपनीच्या वोजनिर्मिती प्रकल्पावर या सवांची नियुक्ती करण्यात आली आहे. कचरा विलगीकरणाच्या कामाबरोबरच अन्य काही कामे त्यांना देण्यात आली आहेत.आणखी ३२ तृतीयपंथीयांची नियुक्ती करणार आहे. शहरातील प्रत्येक कचरा संकलन केंद्रावर (ट्रान्सफर स्टेशन) चार याप्रमाणे आठ केंद्रांवर ही नेमणूक केली जाणार आहे. सध्या शहरात चार ठिकाणी कचरा संकलन केंद्रे आहेत. आणखी चार केंद्र होणार आहेत. तृतीयपंथीयांना देखील सन्मानाने जीवन जगण्याचा, स्वतः ची प्रगती व उन्नती करण्याचा अधिकार असून तृतीयपंथीयांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी महापालिका कटिवद्ध आहे.
