• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सोलापूर जिल्ह्याचे लसीकरणाचे प्रमाण वाढविण्यासाठी सर्व यंत्रणांनी प्रयत्न करावेत – निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार

Yes News Marathi by Yes News Marathi
December 6, 2021
in मुख्य बातमी
0
सोलापूर जिल्ह्याचे लसीकरणाचे प्रमाण वाढविण्यासाठी सर्व यंत्रणांनी प्रयत्न करावेत – निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर :- कोविड 19 चा नवीन ओमीक्रोन व्हेरिएंटचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी राज्य शासनाने दिनांक 27 नोव्हेंबर 2021 रोजी मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या असून त्याची जिल्हास्तरावर काटेकोरपणे अंमलबजावणी प्रत्येक विभागाने करावी. तसेच प्रत्येक विभागाच्या अधिनस्त असलेले कार्यालय व संस्था मधील प्रत्येकाचे लसीकरण करून सोलापूर जिल्ह्याच्या लसीकरणाचे प्रमाण वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार यांनी केले.

         कोविड-19 विषाणूचा संसर्ग व प्रार्दुभाव रोखणेकामी उपाययोजना बाबत आयोजित आढावा बैठकीत श्रीमती पवार बोलत होत्या. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर प्रदीप ढेले, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड, जिल्हा उपनिबंधक श्री. भोळे, राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक नितीन धार्मिक, तहसीलदार डॉक्टर दत्तात्रय मोहोळे, डॉ. सय्यद, डॉ. लोहारे, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक नाशिककर व अन्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

         निवासी उपजिल्हाधिकारी श्रीमती पवार पुढे म्हणाल्या की, सोलापूर जिल्ह्याचे लसीकरणाचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले पाहिजे. पहिला डोस  घेणाऱ्या नागरिकांचे प्रमाण शंभर टक्के व्हावे यासाठी सर्व यंत्रणांनी प्रयत्न करावेत तसेच लसीचा दुसरा डोस घेणाऱ्या नागरिकांची संख्याही किमान 80 टक्के झालं पाहिजे, यासाठी सर्वांनी नागरिकांचे प्रबोधन करावे व प्रशासनाने सुरू केलेल्या लसीकरण मोहीमेस नागरिकांनी ही लस घेऊन सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.

            ओमीक्रोन हा नवीन विषाणू आल्यापासून जिल्ह्यात लसीकरणाच्या प्रमाणात वाढ झालेली दिसून येत आहे. तसेच आजचे लसीकरण 50 हजारापर्यंत गेल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी पवार यांनी देऊन पुढील आठ दिवस रोज किमान 60 हजार नागरिकांचे लसीकरण होण्यासाठी सर्व यंत्रणांनी प्रयत्न करावेत, अशी सूचना त्यांनी दिल्या. 

         जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकांनी कोविड पार्श्‍वभूमीवर प्रशासनाच्या वतीने देण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनांचे तंतोतंत पालन करावे. यामध्ये तोंडाला योग्य पद्धतीने मास्क लावणे, सॅनिटाझर चा वापर करणे, सामाजिक अंतर ठेवणे व हात स्वच्छ धुणे या बाबींचा समावेश आहे असे श्रीमती पवार यांनी सांगून जिल्ह्यातील नागरिकांनी ही लसीकरण केंद्रावर जाऊन लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन केले. लसीकरण न झालेल्या नागरिकांना शासन निर्देशा नुसार मुक्तसंचार लागून असल्याचेही त्यांनी सांगितले.

        जिल्ह्यातील सर्व कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ही तेथील सर्व व्यापारी, मापाडी कामगार व तिथे येणाऱ्या प्रत्येक नागरिकाचे लसीकरण करण्याबाबत बाजार समिती प्रशासनाने दक्षता घ्यावी. आरोग्य विभागाने बाजार समितीच्या मागणीनुसार त्या ठिकाणी लसीकरण करण्याबाबत कॅम्प लावावा अशाही सूचना श्रीमती पवार यांनी दिल्या. यावेळी आरोग्य विभागाच्या वतीने लसीकरणाची माहिती देण्यात आली तर उपस्थित विभागाने त्यांच्या मार्फत राबविण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती बैठकीत सादर केली.
Previous Post

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

Next Post

महाराष्ट्रात मिनी यूपीए सुरु; राहुल गांधींच्या भेटीपूर्वी संजय राऊतांचं वक्तव्य

Related Posts

मुख्यमंत्र्यांचा उद्याचा सोलापूर दौरा ऐनवेळी झाला फिक्स
मुख्य बातमी

मुख्यमंत्र्यांचा उद्याचा सोलापूर दौरा ऐनवेळी झाला फिक्स

August 19, 2026
सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना मुख्यमंत्र्यांकडून शाब्बासकी, विकास कामाला 16 कोटीचे बक्षीस
मुख्य बातमी

सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना मुख्यमंत्र्यांकडून शाब्बासकी, विकास कामाला 16 कोटीचे बक्षीस

August 19, 2026
आज महापालिका सभागृहात बीओटीचा पाढा अन् राडा होणार….!
मुख्य बातमी

आज महापालिका सभागृहात बीओटीचा पाढा अन् राडा होणार….!

August 18, 2026
नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप
मुख्य बातमी

नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

August 17, 2026
किती सुंदर सुंदर हे…सजली सिद्धरामेश्वराची समाधी…!
मुख्य बातमी

किती सुंदर सुंदर हे…सजली सिद्धरामेश्वराची समाधी…!

August 17, 2026
ई-बसेसच्या माध्यमातून सोलापूर शहरातील नागरिकांना दर्जेदार आणि पर्यावरणपूरक वाहतूक सेवा मिळणार – पालकमंत्री जयकुमार गोरे
मुख्य बातमी

ई-बसेसच्या माध्यमातून सोलापूर शहरातील नागरिकांना दर्जेदार आणि पर्यावरणपूरक वाहतूक सेवा मिळणार – पालकमंत्री जयकुमार गोरे

August 16, 2026
Next Post
महाराष्ट्रात मिनी यूपीए सुरु; राहुल गांधींच्या भेटीपूर्वी संजय राऊतांचं वक्तव्य

महाराष्ट्रात मिनी यूपीए सुरु; राहुल गांधींच्या भेटीपूर्वी संजय राऊतांचं वक्तव्य

ताज्या बातम्या

मुख्यमंत्र्यांचा उद्याचा सोलापूर दौरा ऐनवेळी झाला फिक्स

मुख्यमंत्र्यांचा उद्याचा सोलापूर दौरा ऐनवेळी झाला फिक्स

August 19, 2026
जिल्ह्यात 28, 29 व 30 सप्टेंबर रोजी भटके विमुक्त समुह दाखला मेळाव्यांचे आयोजन- जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयेन

सोलापूर जिल्ह्याला MahaSTRIDE टीम अंतर्गत 16 कोटींचे प्रोत्साहन अनुदान मंजूर

August 19, 2026
मोची समाजाच्या ३४ वर्षांपासूनच्या मागणीला आमदार देवेंद्र कोठे यांच्या पाठपुराव्यामुळे यशशब्दपूर्ती केल्याचे समाधान : आमदार देवेंद्र कोठे यांची भावना

मोची समाजाच्या ३४ वर्षांपासूनच्या मागणीला आमदार देवेंद्र कोठे यांच्या पाठपुराव्यामुळे यशशब्दपूर्ती केल्याचे समाधान : आमदार देवेंद्र कोठे यांची भावना

August 19, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026