• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

विद्यार्थ्यांनी आवडीच्या क्षेत्रात नावलौकिक प्राप्त करावा

Yes News Marathi by Yes News Marathi
November 16, 2021
in इतर घडामोडी
0
विद्यार्थ्यांनी आवडीच्या क्षेत्रात नावलौकिक प्राप्त करावा
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर विद्यापीठातील कार्यक्रमात पोलीस आयुक्त बैजल यांचे आवाहन

सोलापूर : विद्यार्थ्यांना ज्या क्षेत्रात रुची आहे, त्याच क्षेत्रात त्यांना करियर करण्याची संधी शिक्षक व पालकांनी द्यावी. आवडीचे क्षेत्र असेल तर विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यास वेळ लागणार नाही. विद्यार्थ्यांनी कष्ट आणि जिद्दीच्या बळावर आपल्या आवडीच्या क्षेत्रात नावलौकिक प्राप्त करावा, असे आवाहन पोलीस आयुक्त हरीश बैजल यांनी केले.

मंगळवारी, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील विद्यार्थी विकास विभागाच्यावतीने आयोजित सतराव्या युवा महोत्सवातील विजेत्यांना पोलीस आयुक्त बैजल यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले, यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस या होत्या. यावेळी प्र-कुलगुरू डॉ. देबेंद्रनाथ मिश्रा, प्रभारी कुलसचिव डॉ. सुरेश पवार यांची प्रमुख उपस्थिती होती. विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. वसंत कोरे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत केले.

पोलीस आयुक्त बैजल म्हणाले की, कोविड संकट काळात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाकडून ऑनलाइन पद्धतीने युवा महोत्सवाचे यशस्वी आयोजन करण्यात आले, ही अतिशय कौतुकास्पद बाब आहे. यामुळे विद्यार्थ्यांना आपल्या अंगभूत कलागुणांना विकसित करण्याची एक संधी लाभली. वास्तविक विद्यार्थ्यांनी आपल्याला जे आवडतं तेच करावं. मनामध्ये कोणताही न्यूनगंड बाळगू नये. आवडीच्या क्षेत्रात अपार मेहनत घेऊन कष्ट करावे आणि यश संपादन करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस म्हणाल्या की, कोविड काळात ऑनलाइन युवा महोत्सव घेणारे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ हे राज्यातील एकमेव आहे. कडक शिस्तीत व नियमांचे पालन करत युवा महोत्सवाचे यशस्वी नियोजन झाले. यामुळे युवा विद्यार्थ्यांच्या सृजनशीलतेला प्रेरणा मिळाली. आनंदित होऊन विद्यार्थी कलाप्रकार सादरीकरणात दंग झाली. विद्यार्थ्यांना आवडीच्या क्षेत्रात करिअर करण्यासाठी विद्यापीठात विविध मार्ग विकसित करण्यात आले आहेत. विद्याशाखा बद्दल अभ्यासक्रम, इनक्युबेशन सेंटर, स्टार्टअप, विविध स्किल कोर्सेस असे विविध उपक्रम विद्यापीठात सुरू असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. ममता बोल्ली यांनी केले. बक्षीस वितरणाचे वाचन प्रा. यशपाल खेडकर यांनी केले तर आभार राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉ. गुणवंत सरवदे यांनी केले.

यांचा झाला सन्मान
सतराव्या युवा महोत्सवाचे प्रथम पारितोषिक प्राप्त केलेल्या दयानंद कला व शास्त्र महाविद्यालयाचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. शिवाजी महाविद्यालय, बार्शीच्या संघाने द्वितीय तर पंढरपूरच्या कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयाच्या संघाने तृतीय क्रमांकाचा बक्षीस प्राप्त केला. यावेळी त्यांचाही सन्मान करण्यात आला. नियतकालिक स्पर्धेमध्ये पारंपरिक गटात दयानंद कला व शास्त्र महाविद्यालय आणि हिराचंद नेमचंद कॉलेजने प्रथम क्रमांक पटकाविला. संगमेश्वर कॉलेज द्वितीय तर वालचंद कॉलेजला तृतीय क्रमांकाचे बक्षीस मिळाले. केबीपी पंढरपूर व सांगोला कॉलेजला उत्तेजनार्थचे बक्षीस मिळाले. नियतकालिके स्पर्धेत व्यवसाय गटात स्वेरी कॉलेज-प्रथम, शिक्षणशास्त्र महाविद्यालय, बार्शी- द्वितीय, उमा शिक्षणशास्त्र महाविद्यालय, पंढरपूर- तृतीय तर कस्तुरबाई कॉलेज ऑफ एज्युकेशन, सोलापूरने उत्तेजनार्थचे पारितोषिक पटकाविले. यांचाही यावेळी पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमात विद्यापीठातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पाल्यांचाही गुणगौरव सोहळा पार पडला.

सोलापूर: सतराव्या युवा महोत्सवाचे सर्वसाधारण विजेतेपदाचे प्रथम क्रमांक पटकाविलेल्या दयानंद कला व शास्त्र महाविद्यालयास पारितोषिक प्रदान करताना पोलीस आयुक्त हरीश बैजल, कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस, प्र-कुलगुरू डॉ. देबेंद्रनाथ मिश्रा, प्रभारी कुलसचिव डॉ. सुरेश पवार व विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. वसंत कोरे.

Previous Post

विस्तारणाऱ्या माध्यम क्षेत्रातील संधीचे सोने करा : डॉ. रवींद्र चिंचोलकर

Next Post

काँग्रेसमधील अंतर्गत कलह चव्हाट्यावर; भाई जगतापांविरोधात हायकमांडकडे तक्रार

Related Posts

योग, विज्ञान आणि संस्कृतीचा संगम..राज्यस्तरीय “योग शास्त्र संगमम्” २६ ते २८ जून २०२६
इतर घडामोडी

योग, विज्ञान आणि संस्कृतीचा संगम..राज्यस्तरीय “योग शास्त्र संगमम्” २६ ते २८ जून २०२६

June 23, 2026
श्री विठ्ठल रुक्मिणीमाता मूर्ती संवर्धनाबाबत महत्त्वाचे निवेदन
इतर घडामोडी

श्री विठ्ठल रुक्मिणीमाता मूर्ती संवर्धनाबाबत महत्त्वाचे निवेदन

June 22, 2026
मध्य रेल्वेच्या ११ कर्मचाऱ्यांना ‘महाव्यवस्थापक संरक्षा’ पुरस्कार प्रदान
इतर घडामोडी

मध्य रेल्वेच्या ११ कर्मचाऱ्यांना ‘महाव्यवस्थापक संरक्षा’ पुरस्कार प्रदान

June 22, 2026
भीमा नदीकाठच्या शेतकऱ्यांचा एल्गार; वीजपुरवठा वाढवा, उसबिले तात्काळ द्या!
इतर घडामोडी

भीमा नदीकाठच्या शेतकऱ्यांचा एल्गार; वीजपुरवठा वाढवा, उसबिले तात्काळ द्या!

June 22, 2026
कन्नड भाषेच्या जतनासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज
इतर घडामोडी

कन्नड भाषेच्या जतनासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज

June 20, 2026
गुगलच्या साथीने महाराष्ट्र सज्ज; 4 लाख शिक्षक शिकणार AI चे धडे
इतर घडामोडी

गुगलच्या साथीने महाराष्ट्र सज्ज; 4 लाख शिक्षक शिकणार AI चे धडे

June 20, 2026
Next Post
काँग्रेसमधील अंतर्गत कलह चव्हाट्यावर; भाई जगतापांविरोधात हायकमांडकडे तक्रार

काँग्रेसमधील अंतर्गत कलह चव्हाट्यावर; भाई जगतापांविरोधात हायकमांडकडे तक्रार

ताज्या बातम्या

TOP 25 । आचारसंहिता संपली..आता तरी महापालिका, झेडपी पदाधिकाऱ्यांनी विकास कामाकडे द्यावे लक्ष

TOP 25 । आचारसंहिता संपली..आता तरी महापालिका, झेडपी पदाधिकाऱ्यांनी विकास कामाकडे द्यावे लक्ष

June 23, 2026
योग, विज्ञान आणि संस्कृतीचा संगम..राज्यस्तरीय “योग शास्त्र संगमम्” २६ ते २८ जून २०२६

योग, विज्ञान आणि संस्कृतीचा संगम..राज्यस्तरीय “योग शास्त्र संगमम्” २६ ते २८ जून २०२६

June 23, 2026
श्री विठ्ठल रुक्मिणीमाता मूर्ती संवर्धनाबाबत महत्त्वाचे निवेदन

श्री विठ्ठल रुक्मिणीमाता मूर्ती संवर्धनाबाबत महत्त्वाचे निवेदन

June 22, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मॅच रिपोर्ट: साऊथ सोलापूर ब्लूचा दिमाखदार विजय

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026