गरीब महिलांना अन्न धान्याचे किट आणि विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप वाढदिवस साजरा
सोलापूर – राष्ट्रवादीचे युवा आमदार रोहित पवार यांचा वाढदिवस रोप फाउंडेशनच्या वतीने विविध उपक्रमाने साजरा करण्यात आले .राष्ट्रवादीचे नेते महेश कोठे यांच्या हस्ते सोलापुरातील 500 गरजू महिलांना यावेळी मदत वाटप करण्यात आले.
रोप फाउंडेशनच्या वतीने गोर गरीब , गरजू आणि निराधारांना मोफत धान्याचे किटचे वाटप करण्यात आले.गरीब विध्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप देखील यावेळी करण्यात आले.हा कार्यक्रम महापालिकेतील जेष्ठ नेते महेश कोठे आणि काँग्रेस नेते सुधीर खरटमाल , राष्ट्रवादीचे प्रांतिक सदस्य प्रशांत बाबर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यावेळी काँग्रेस पक्षाचे नेते सुधीर खरटमल , राष्ट्रवादी काँग्रेस चे प्रांतिक सदस्य प्रशांत बाबर ,इफतेकार तुळजापूरे , उधोजक तथा रोप फाऊंडिशन चे संस्थापक नजीब शेख , अजमल शेख ,अल्पसंख्यक अध्यक्ष गफूर शेख , आदींची प्रमुख उपस्थिती होती.











