• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सर्वोच्च न्यायालयात वकील का दिला नाही? याचा खुलासा सरकारने करावा

Yes News Marathi by Yes News Marathi
September 14, 2021
in इतर घडामोडी
0
सर्वोच्च न्यायालयात वकील का दिला नाही? याचा खुलासा सरकारने करावा
0
SHARES
0
VIEWS

ओबीसी समाजाचा विश्वासघात करणाऱ्या आघाडी सरकार विरोधात भाजपा तर्फे राज्यभर आंदोलन

ओबीसी समाजाचा विश्वासघात करून ओबीसी आरक्षण घालविणाऱ्या आघाडी सरकारच्या विरोधात भारतीय जनता पार्टी तर्फे उद्या 15 सप्टेंबर रोजी राज्यभर आंदोलन करण्यात येणार आहे, अशी घोषणा सोलापूर जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांनी मंगळवारी केली. आघाडी सरकारने सर्वोच्च न्यायालयात ओबीसी आरक्षणाची बाजू मांडण्यासाठी वकिलच दिला नाही, या काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या आरोपावर मुख्यमंत्री ठाकरे व ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी उत्तर द्यावे, अशी मागणीही श्रीकांत देशमुख यांनी केली.

श्रीकांत देशमुख यांनी सांगितले की, गेले सहा महिने आघाडी सरकार ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणाबाबत टोलवाटोलवी करत आहे. ओबीसी समाजाचा इम्पिरीकल डेटा गोळा करण्यासाठी तातडीने कार्यवाही सुरू करा, असे भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाने राज्य सरकारला सातत्याने सांगितले आहे. मात्र आघाडी सरकारने गेल्या सहा महिन्यांत काही हालचालीच केल्या नाहीत. इम्पिरीकल डेटा गोळा करण्यासाठी नेमलेल्या मागासवर्गीय आयोगाला आघाडी सरकारने निधीही दिला नाही. या हलगर्जीचा परिणाम ओबीसी आरक्षणाशिवाय 5 स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होण्यात झाला आहे.

सत्ताधारी पक्षातील वजनदार गटाला पुढील वर्षी होणाऱ्या महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद निवडणुका ओबीसी समाजाला आरक्षण न देताच घ्यावयाच्या असल्याने राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात ओबीसी आरक्षणाची बाजू प्रभावीपणे मांडली नाही. राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात वकिलच उभा केला नाही असे सत्ताधारी पक्षाचा प्रदेशाध्यक्ष म्हणतो आहे. विधी व न्याय खात्याची जबाबदारी सांभाळणाऱ्या मुख्यमंत्री ठाकरे यांनी व आघाडी सरकारचे पालक म्हणविणाऱ्या शरद पवार यांनी नाना पटोले यांच्या आरोपावर खुलासा करावा, असेही त्यांनी सांगितले.

ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका होणार नाहीत असे वारंवार सांगणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी आरक्षण टिकविण्यासाठी काहीच हालचाल केली नाही.ओबीसी समाजाच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्या आघाडी सरकारच्या विरोधात भारतीय जनता पार्टीतर्फे उद्या 15 सप्टेंबर रोजी तालुका पातळीपर्यंत आंदोलन केले जाईल, असेही श्रीकांत देशमुख यांनी नमूद केले.

आज याच विषयात सोलापुरात पत्रकार परिषद झाली. पत्रकार परिषदेला जिल्हा संघटन सरचिटणीस शशिकांत चव्हाण, भाजपा शहर अध्यक्ष विक्रम देशमुख, भाजपा ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष बाळासाहेब ढगे, ओबीसी मोर्चा शहराध्यक्ष राम वाकसे, ओबीसी मोर्चा महिला शहर अध्यक्ष अर्चना वडनाल, ओबीसी मोर्चा महिला जिल्हा अध्यक्ष माया माने आदी उपस्थित होते.

Previous Post

ओमकार सामाजिक संस्थेत मोफत आरोग्य शिबिर

Next Post

सोलापूर शहर राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष संतोष भाऊ पवार यांच्या हस्ते बुधवारी Yes News मराठीच्या गणरायाची पूजा करण्यात आली

Related Posts

पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केली श्री विठ्ठल- रुक्मिणी मंदीराची पाहणी
इतर घडामोडी

पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केली श्री विठ्ठल- रुक्मिणी मंदीराची पाहणी

June 28, 2026
करमाळा येथील शासकीय आयटीआयचे ‘मदनदास देवी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था’ असे नामकरण
इतर घडामोडी

करमाळा येथील शासकीय आयटीआयचे ‘मदनदास देवी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था’ असे नामकरण

June 28, 2026
आषाढी यात्रा कालावधीत स्वच्छतेला प्राधान्य द्यावे- पालकमंत्री जयकुमार गोरे
इतर घडामोडी

आषाढी यात्रा कालावधीत स्वच्छतेला प्राधान्य द्यावे- पालकमंत्री जयकुमार गोरे

June 28, 2026
सोलापूर महानगरपालिकेच्या पल्स पोलिओ अभियानाचा शुभारंभ
इतर घडामोडी

सोलापूर महानगरपालिकेच्या पल्स पोलिओ अभियानाचा शुभारंभ

June 28, 2026
पावसासाठी सोलापुरात मुस्लिम समाजाचे सामुदायिक नमाज पठण, साश्रू नयनांनी अल्लाहकडे पावसासाठी साकडे
इतर घडामोडी

पावसासाठी सोलापुरात मुस्लिम समाजाचे सामुदायिक नमाज पठण, साश्रू नयनांनी अल्लाहकडे पावसासाठी साकडे

June 28, 2026
शिवारायांचा राज्याभिषेक हे क्रांतीकारी पाऊल – सुधाकर इंगळे महाराज
इतर घडामोडी

शिवारायांचा राज्याभिषेक हे क्रांतीकारी पाऊल – सुधाकर इंगळे महाराज

June 27, 2026
Next Post
सोलापूर शहर राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष संतोष भाऊ पवार यांच्या हस्ते बुधवारी Yes News मराठीच्या गणरायाची पूजा करण्यात आली

सोलापूर शहर राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष संतोष भाऊ पवार यांच्या हस्ते बुधवारी Yes News मराठीच्या गणरायाची पूजा करण्यात आली

ताज्या बातम्या

पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केली श्री विठ्ठल- रुक्मिणी मंदीराची पाहणी

पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केली श्री विठ्ठल- रुक्मिणी मंदीराची पाहणी

June 28, 2026
करमाळा येथील शासकीय आयटीआयचे ‘मदनदास देवी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था’ असे नामकरण

करमाळा येथील शासकीय आयटीआयचे ‘मदनदास देवी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था’ असे नामकरण

June 28, 2026
आषाढी यात्रा कालावधीत स्वच्छतेला प्राधान्य द्यावे- पालकमंत्री जयकुमार गोरे

आषाढी यात्रा कालावधीत स्वच्छतेला प्राधान्य द्यावे- पालकमंत्री जयकुमार गोरे

June 28, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मॅच रिपोर्ट: साऊथ सोलापूर ब्लूचा दिमाखदार विजय

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026