• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

पंतप्रधान मोदी म्हणाले, “छत्रपती शिवाजी महाराज नसते तर…”

Yes News Marathi by Yes News Marathi
August 13, 2021
in इतर घडामोडी
0
पंतप्रधान मोदी म्हणाले, “छत्रपती शिवाजी महाराज नसते तर…”
0
SHARES
0
VIEWS

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंना शंभराव्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. पुण्यामधील शिवसृष्टीमध्ये बाबासाहेबांच्या शंभराव्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमामध्ये मोदींनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून विशेष संदेश दिला. यावेळी मोदींनी बाबासाहेब पुरंदरेंनी केलेले काम हे अतुलनिय आहे असे सांगतानाच त्यांच्या शंभराव्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्याची संधी मिळाली हे आपले भाग्य असल्याचे नमूद केले . तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलच्या आपल्या भावनाही व्यक्त केल्या. छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आणि कार्य आजही आपल्या देशाला प्रेरणा देत असल्याचे सांगतानाच छत्रपती शिवाजी महाराजांशिवाय आपल्या देशाचा विचारही करता येणार नाही असेही मोदी म्हणाले.

छत्रपती शिवाजी महाराज भारताच्या इतिहासाचे शिखर पुरुष आहेत. शिवाय भारताचा वर्तमानकाळ आणि भूगोलसुद्धा त्यांच्या अमरगाथेने प्रभावित झालेला आहे. आपल्या या भूतकाळाचा, वर्तमानाचा आणि भविष्याचा विचार केल्यावर एक खूप मोठा प्रश्न आहे की छत्रपती शिवाजी महाराज नसते तर काय झालं असतं? छत्रपती शिवाजी महाराजांशिवाय भारताच्या सध्याच्या स्वरुपाची भारताच्या गौरवाची कल्पनाही करता येणार नाही. त्यामुळेच महाराजांबद्दल बाबासाहेबांना एवढी भक्ती आहे, असे गौरवोदगार पंतप्रधानांनी काढले. बाबासाहेब त्यांच्या वयाच्या शंभराव्या वर्षात प्रवेश करत असतानाच आपला देश स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्षात प्रवेश करतो आहे . बाबासाहेबांनाही हा योगायोग म्हणजे त्यांना भारतमातेने दिलेला आशिर्वादच वाटत असणार यात शंका नाही. असेही मोदी म्हणाले. छत्रपती शिवाजी महाराजांचे जे आदर्श बाबासाहेबांनी देशासमोर ठेवण्याचा प्रयत्न केलाय तो आम्हाला कायमच प्रेरणा देत राहणार आहे, असंही मोदींनी बाबासाहेबांच्या कार्याचे कौतुक करताना म्हटले . तरुण इतिहासकारांनी बाबासाहेबांकडून बरच काही शिकण्यासारख आहे असही मोदींनी सांगितले . त्याचप्रमाणे इतिहासाबरोबरच बाबासाहेबांनी वर्तमानाचीही काळजी घेतली, गोवा मुक्ती संग्रामापासून ते दादरा नगर हवेलीच्या संघर्षाच्या वेळेस त्यांची भूमिका कौतुकास्पद ठरल्याचे मोदींनी म्हटले आहे.छत्रपती शिवाजी महाराजांचं जीवन आणि इतिहास लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी त्यांनी जे योगदान दिलं आहे त्यासाठी आपण सर्वच त्यांचे ऋणी राहू. या शंभराव्या वाढदिवसानिमित्त देशाला त्यांच्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी मिळाली हे भाग्यच आहे. मी भवानी मातेच्या चरणी प्रार्थना करतो की तुम्हाला उदंड आयुष्य लाभावं अशी प्रार्थना मी करतो, अशा शब्दांसहीत मोदींनी बाबासाहेबांना शुभेच्छा दिल्या.२०१९ मध्ये त्यांना पद्मविभूषण पुरस्कार दिला, २०१५ मध्ये महाराष्ट्रभूषण पुसस्कार दिला. मध्य प्रदेशमधील शिवराज सिंह सरकारने या छत्रपती शिवाजी महाराजांच्या या परमभक्ताला (बाबासाहेब पुरंदरेंना) कालीदास पुरस्कार देऊन गौरवले होते , अशी आठवणही मोदींनी यावेळी करुन दिली.

Previous Post

आयुर्वेदतज्ज्ञ बालाजी तांबे यांचे निधन कोरोनामुळे

Next Post

लसीचा तिसरा डोसही गरजेचा : सायरस पूनावाला

Related Posts

एमएमसी नोंदणीसाठी सोलापूरमध्ये सीसीएमपी डॉक्टरांचा आंदोलनाला जाहिर पाठिंबा!
इतर घडामोडी

एमएमसी नोंदणीसाठी सोलापूरमध्ये सीसीएमपी डॉक्टरांचा आंदोलनाला जाहिर पाठिंबा!

August 18, 2026
महा वॉकेथॉन २०२६-वॉक फॉर वॉटर मध्ये नागरिकांनी सहभागी व्हावे- मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांचे आवाहन
इतर घडामोडी

महा वॉकेथॉन २०२६-वॉक फॉर वॉटर मध्ये नागरिकांनी सहभागी व्हावे- मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांचे आवाहन

August 18, 2026
पुण्यात आजपासून जमावबंदी, रील्स सोशल मीडियावर टाकल्यास कारवाई..!
इतर घडामोडी

पुण्यात आजपासून जमावबंदी, रील्स सोशल मीडियावर टाकल्यास कारवाई..!

August 18, 2026
ज्यांच्या नशिबी सण नव्हता, त्यांच्या चेहऱ्यावर आस्थेने फुलवले हास्य!
इतर घडामोडी

ज्यांच्या नशिबी सण नव्हता, त्यांच्या चेहऱ्यावर आस्थेने फुलवले हास्य!

August 18, 2026
शिवदारे आण्णा म्हणजे सोलापूरची मोठी संपत्ती! – आमदार बसवराज पाटील
इतर घडामोडी

शिवदारे आण्णा म्हणजे सोलापूरची मोठी संपत्ती! – आमदार बसवराज पाटील

August 18, 2026
मजूर सहकारी संस्थांच्या कामांची मर्यादा ३० लाखांपर्यंत करा
इतर घडामोडी

मजूर सहकारी संस्थांच्या कामांची मर्यादा ३० लाखांपर्यंत करा

August 18, 2026
Next Post
लसीचा तिसरा डोसही गरजेचा :  सायरस पूनावाला

लसीचा तिसरा डोसही गरजेचा : सायरस पूनावाला

ताज्या बातम्या

एमएमसी नोंदणीसाठी सोलापूरमध्ये सीसीएमपी डॉक्टरांचा आंदोलनाला जाहिर पाठिंबा!

एमएमसी नोंदणीसाठी सोलापूरमध्ये सीसीएमपी डॉक्टरांचा आंदोलनाला जाहिर पाठिंबा!

August 18, 2026
महा वॉकेथॉन २०२६-वॉक फॉर वॉटर मध्ये नागरिकांनी सहभागी व्हावे- मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांचे आवाहन

महा वॉकेथॉन २०२६-वॉक फॉर वॉटर मध्ये नागरिकांनी सहभागी व्हावे- मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांचे आवाहन

August 18, 2026
पुण्यात आजपासून जमावबंदी, रील्स सोशल मीडियावर टाकल्यास कारवाई..!

पुण्यात आजपासून जमावबंदी, रील्स सोशल मीडियावर टाकल्यास कारवाई..!

August 18, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026