लंडन : युरो कप 2020मध्ये चमकदार कामगिरी केलेल्या क्रिस्तियानो रोनाल्डोला गोल्डन बूटने सन्मानित करण्यात आले. रोनाल्डोने या स्पर्धेत 4 सामने खेळले असून त्याने 5 गोल केले. तसेच एक गोल करण्यासाठी त्याने मदत केली होती.
दुसरीकडे, झेक प्रजासत्ताकच्या पॅट्रिक स्किकनेही 5 सामन्यांत 5 गोल केले, पण त्याने एकही गोल करण्यात मदत केली नाही. त्यामुळे रोनाल्डोला हा पुरस्कार देण्यात आला. अंतिम-16मध्ये बेल्जियमकडून 1-0 ने पराभव पत्करावा लागल्याने पोर्तुगालला स्पर्धेतून बाहेर जावे लागले.
युरो 2020 सर्वाधिक गोल करणारे खेळाडू –
1)क्रिस्तियानो रोनाल्डो (पोर्तुगाल) – 4 सामन्यात 5 गोल
2) पॅट्रिक स्किक (झेक प्रजासत्ताक) – 5 सामन्यांत 5 गोल
3)करीम बेंझेमा (फ्रान्स) – 4 सामन्यांत 4 गोल
4)एमिल फॉसबर्ग (स्वीडन) – 4 सामन्यांत 4 गोल
5)रोमेलु लुकाकू (बेल्जियम) – 5 सामन्यांत 4 गोल
सर्वाधिक गोल –
1) इटली (7 सामन्यात 13 गोल) आणि स्पेन (6 सामन्यात 13 गोल)
सर्वात कमी गोल –
फिनलँड, तुर्की आणि स्कॉटलँडने तीन सामन्यात प्रत्येकी 1 गोल केला होता.
सर्वोत्तम बचाव :
इंग्लंडने 7 सामन्यात फक्त दोन गोल स्वीकारले
सर्वात वाईट बचाव :
युक्रेनने 5 सामन्यांत 10 गोल स्वीकारले.
वैयक्तिक पुरस्कार –
गोल्डन बूट – क्रिस्तियानो रोनाल्डो (पोर्तुगाल) – 4 सामने 5 गोल
सिल्वर बूट – पॅट्रिक स्किक (झेक प्रजासत्ताक) – 5 गोल
ब्राँझ बूट – करीम बेंझेमा
गोल्डन बॉल (प्लेअर ऑफ द टूर्नामेंट) : जियान्लुइगी डोन्नारुम्मा
- युरोमधील प्लेअर ऑफ द टूर्नामेंट म्हणून निवड झालेला तो पहिला गोलकीपर ठरला.
युरो 2020 ची बक्षीस रक्कम
विजेता संघ – इटली – 103.5 कोटी रुपये
उपविजेता संघ – इंग्लंड – 72.4 कोटी रुपये







