सोलापूर : हैदराबाद रस्त्यावरील मार्केट यार्ड नजीकच्या सिद्धेश्वर शॉपिंग सेंटर मधील गाळा नंबर 31/अ , गाळा क्रमांक बी 18, गाळा क्रमांक b15 आणि सुरज धूत यांचा गाळा असे चार गाळे सात जुलै रोजी रात्री सोडण्यात आल्याची फिर्याद जेलरोड पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. अडकी टेलर या दुकानातून साडेसात हजार रुपयांचे पाच नविन जोड कपडे मसाज मशीन आणि रोख रक्कम असे दहा हजार रुपये चोरण्यात आले आहेत. यावेळी चोरट्यांनी स्विफ्ट कार आणि सियाना मॉडेलच्या वाहनाची काच फोडून अंदाजे बाराशे रुपयांचे नुकसान केले आहे. आनंद अंबादास फडके यांनी या प्रकरणी तक्रार केली असून पोलीस सब इन्स्पेक्टर निगडे अधिक तपास करीत आहेत.