मुंबई : शिवसेनेचे खासदार संजय राऊत आज पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीला पोहोचले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी ही भेट होत आहे. शनिवारीही संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. त्यानंतर आज दुसऱ्यांदा राऊत मुख्यमंत्र्यांच्या भेटीला पोहोचले आहेत. याच पार्श्वभूमीवर शिवसेना मंत्री आणि आमदारातील नाराजी, त्याचबरोबर शरद पवार यांचा एखादा निरोप घेऊन राऊत मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेले असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.