येस न्युज मराठी नेटवर्क : २१ जूनपासून देशात १८ ते ४४ या वयोगटासाठी देखील केंद्र सरकारकडून मोफत लसीकरणाची सुरुवात करण्यात आली. पहिल्याच दिवशी ८३ लाख नागरिकांना लस देण्यात आली. त्यामुळे गेल्या आठवड्याभरात लसीकरणाचा वेग वाढला असून आजच्या ताज्या आकडेवारीनुसार भारताने डोसच्या संख्येमध्ये अमेरिकेलाही मागे टाकले आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार भारतात सोमवारी २८ जून २०२१ रोजी सकाळी ८ वाजेपर्यंत ३२ कोटी ३६ लाख ६३ हजार २९७ लसीचे डोस देण्यात आले आहेत. हा जगात सर्वाधिक लसीकरणाचा आकडा असून ही ऐतिहासिक कामगिरी असल्याचे केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी म्हटले आहे.