पुणे : उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी मोठी माहिती दिली आहे. येत्या 15 सप्टेंबरपासून महाविद्यालयीन शैक्षणिक वर्ष सुरु करण्याचा प्रयत्न करत असल्याचे त्यांनी सांगितले . तसेच यावर लवकरच निर्णय जाहीर केला जाणार असल्याची माहिती उदय सामंत यांनी दिली आहे.पुण्यात जिल्हाधिकारी कार्यालयात उदय सामंत यांची पत्रकार परिषद पार पडली. या परिषदेत बोलताना त्यांनी ही माहिती दिली आहे.