सोलापुर : जूना विडी घरकुल येथील कृष्णवेनी नगर मधील घराचा दरवाजा कशाने तरी तोडून कपाटातील ६,५०० रुपयांचा माल तसेच गॅस टाकी चोरल्याची फिर्याद एमआयडीसी पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. २६ जून रोजी रात्री साडेनऊ ते २७ जून रोजी दुपारी १ वाजेपर्यंत ही चोरी झाल्याचे सौ नंदा पवार यांनी फिर्यादीत म्हटले आहे. पोलीस नाईक शिंदे अधिक तपास करीत आहेत. लहान इरणा वस्तीतील वीस वर्षाची तरुणी बेपत्ता सोलापूर : लहान इरणा वस्तीतील प्रियांका चंद्रकांत तूपदोळकर ही वीस वर्षाची तरुणी 19 जून रोजी घरातून बेपत्ता झाल्याची तक्रार विनोद तूपदोळकर यांनी सदर बझार पोलिस ठाण्यात केली आहे. कॉलेजला जाते असे सांगून प्रियांका ही घरातून गेली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. तिने काळ्या रंगाचा टॉप घातलेली असून तिचा रंग सावळा असल्याचे अर्जात म्हटले आहे. याप्रकरणी पोलीस नाईक ए. आर. शेख अधिक तपास करीत आहेत.