सोलापूर : विजापूर रोडवरील सैफुल भागातील वैष्णवी मंदिर येथे नगरसेवक गुरुशांत धुत्तरगावकर यांच्या हस्ते पूजा करण्यात आली. त्यानंतर इको फ्रेंडलीचे मनोज देवकर यांनी वडाचे अकरा रोपे महिलांना वाटप केले.तसेच गुरुवारी वटपौर्णिमेच्या निमित्ताने सर्व महिला एकत्र येऊन मंदिरामध्ये पूजा करून वडाच्या झाडाला फेऱ्या मारण्यात आल्या.यावेळी नीलिमा शितोळे, धुत्तरगावकर, सोलापूर फाऊंडेशनचे पल्लवी माने,संदीप हेसे अनुसया लोहार अनुराधा खारे शोभा सरवदे पुष्पा मस्के,सुरेश बिराजदार, सचिन जगताप श्रीनाथ नळे, यांच्यासह अन्य महिला उपस्थित होते.