सोलापूर : शिवसंतोष हॉस्पिटल मध्ये ९ जून रोजी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास रुग्ण मळ्यात झाल्याचा राग मनात धरून गोंधळ घालण्यात आला. शिवसंतोष हॉस्पिटल मधील श्वेतशांत औषधालयाच्या दोन मोठ्या काचा फोडण्यात आल्या. तसेच व्हीलचेअर खाली आपटून अंदाजे २० हजार रुपयांचे नुकसान केल्याची फिर्याद फौजदार चावडी पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. रुग्णालयाचा वॉचमन सुधीर माशाळ यांना शिवीगाळ करण्यात आली. तसेच पार्किंगमध्ये लावलेल्या दुचाकी गाड्यांना लाथा मारून नुकसान केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी सौदागर क्षीरसागर , सोमनाथ सर्वगौड, प्रकाश दोडमनी, सागर तोडकरी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस सब इन्स्पेक्टर देशमाने अधिक तपास करीत आहेत.