सोलापूर : दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने वहिनीच्या गळ्यातील सोन्याचे गंठण पळवल्याचा प्रकार सोरेगाव येथील भिमनगर भागात घडला आहे . भीमनगरमध्ये राहणाऱ्या मिथुन प्रकाश कांबळे याच्या चुलत भावाने दारू पिण्यासाठी पैसे मागितले होते. मिथुन कांबळे यांच्या पत्नीने पैसे देणार नाही , असे सांगितल्यानंतर निखिल मारुती कांबळे याने चिडून मिथुन व त्याच्या पत्नीस चाकूचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी दिली आहे. त्याचप्रमाणे मिथुन कांबळे यांच्या पत्नीच्या गळ्यातील दोन तोळ्याचे गंठण घेऊन निघून गेल्याची तक्रार करण्यात आली आहे. याप्रकरणी विजापूर नाका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून हवालदार चव्हाण अधिक तपास करीत आहेत.

