सोलापूर : शहराचा covid-19 चा ३ जून रोजी चा अहवाल प्राप्त झाला आहे. बुधवारी रात्री १२ वाजेपर्यंत संपलेल्या २४ तासात शहरातील १६ नवीन व्यक्तींना कोरोनाची बाधा झाली आहे . या कालावधीत ७७ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत . या कालावधीत दोघांचा कोरोनामुळे मृत्यू ओढवला आहे . प्रभागनिहाय बाधित रुग्णांचा आढावा घेतला असता प्रभाग क्रमांक २३ मध्ये सर्वाधिक ४ आणि प्रभाग क्रमांक २४ मध्ये ३ रुग्ण आढळले आहेत .
