सोलापूर : गेल्या महिनाभरापासून देशवासीयांची झोप उडवणाऱ्या कोरोना आता दिवस ‘भरले’ आहेत. मोठ्या प्रमाणावर रुग्ण बरे होऊ लागले असून पॉझिटिव्ह रुग्ण देखील कमी प्रमाणावर आढळून येत आहेत. कुणी बेड देता का बेड… ऑक्सिजन आहे का अक्सिजन… आमच्या पेशंटला रेमेडीसी वर इंजेक्शन द्या हो… अशी हृदय पिळवटून टाकणारी गेल्या महिनाभरातील दृश्य आता नाहीशी होऊ लागली आहेत .सोलापूर शहर आणि जिल्ह्यात रेडीमेडेसीवर इंजेक्शनचा साठा आता शिल्लक आहे .पंधरा टन ऑक्सिजन देखील पडून आहे. अनेक हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजनचे बेड रिकामी झाले आहेत.
सोलापूर ग्रामीण भागातील 25 टक्क्यांच्या पुढे गेलेला पॉझिटिव्हिटी रेट आता दहा टक्क्यांच्या आसपास आला आहे. हे ही दिवस जातील… या आशेपोटी अनेकांचे मनोबल वाढू लागले आहे. त्यामुळे शासन देखील आता लॉकडाऊन च्या बंदिवासातून एक जून नंतर टप्प्याटप्प्याने नागरिकांना दिलासा देणार आहे. मान्सूनच्या आगमनाच्या शुभसंकेता बरोबरच महाभयंकर असलेली कोरोना ची दुसरी लाट ओसरू लागल्याने सर्वत्र दिलासा दायक वातावरण निर्माण होऊ लागले आहे
