सोलापूर : न्यू बुधवार पेठ येथील मांजरी चौक येथे राहणाऱ्या सुज्ञानी विशांत जाधव या विवाहितेने पती , सासू, सासरे यांच्याविरुद्ध जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. सुज्ञानी जाधव यांचा विवाह विशांत जाधव यांच्याबरोबर झालेला असून पती तसेच सासु नंदा जाधव आणि सासरे दशरथ जाधव यांच्याविरुद्ध तक्रार केली आहे. मूलबाळ होत नाही तसेच स्वयंपाक करता येत नाही , वेडी आहे असे म्हणून सासरच्या मंडळींनी मारहाण केली तसेच शिवीगाळ करून मानसिक त्रास देवून माहेरी हाकलून दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी जोडभावी पेठ पोलीस ठाण्याचे हवालदार ओहळ अधिक तपास करीत आहेत.

