• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

पुष्टिपती विनायक जन्मानिमित्त ‘दगडूशेठ’ गणपतीसमोर ५०० शहाळ्यांची आरास

Yes News Marathi by Yes News Marathi
May 26, 2021
in मुख्य बातमी
0
पुष्टिपती विनायक जन्मानिमित्त ‘दगडूशेठ’ गणपतीसमोर ५०० शहाळ्यांची आरास
0
SHARES
0
VIEWS

येस न्युज मराठी नेटवर्क : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट व सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे आयोजन ;पुष्टिपती विनायक जयंती (गणेशजन्म) निमित्त महानैवेद्य* ; वैश्विक महाविघ्न कोरोना लवकर दूर होण्याकरीता प्रार्थना ; ससून रुग्णालयात होणार प्रसाद वाटप

पुणे : श्री गणेशांचे विविध लीला स्वरुपात अनेक अवतार पाताळ, पृथ्वी व स्वर्गलोकात झाल्याचे आपल्या पुराणात सापडते. त्यापैकी एक म्हणजे पुष्टिपती विनायक अवतार. पुष्टिपती विनायक जयंतीनिमित्त दगडूशेठ गणपती मंदिरात शहाळे महोत्सव आयोजित करण्यात आला. महोत्सवात तब्बल ५०० शहाळ्यांमध्ये दगडूशेठचे गणपती बाप्पा विराजमान झाले. शिव-पार्वतीच्या घरी वैशाख शुद्ध पौर्णिमेच्या शुभदिनी दुर्मती राक्षसाच्या वधार्थ झालेला हा अवतार आहे.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट व सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे मंदिरात शहाळे महोत्सव आयोजित करण्यात आला. वेदमूर्ती मिलिंद राहुरकर गुरुजी यांच्या हस्ते गणेश जन्माची पूजा व अभिषेक झाला. बुधवारी सूर्योदयाच्या वेळी हा गणेशजन्म सोहळा पार पडला. तसेच मंदिरामध्ये गणेशयाग देखील झाला. वैशाख वणव्यापासून तमाम भारतीयांचे रक्षण व्हावे, दुष्काळ, पाण्याचे दुर्भिक्ष शेतक-यांच्या समस्या यासोबत वैश्विक महाविघ्न कोरोना लवकर दूर होण्याकरीता गणरायाच्या कृपेने निर्विघ्न व्हाव्यात, ही भावना महोत्सवामागे होती.

ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे म्हणाले, श्रीगणेश पुराण व मुद्गल पुराण या ग्रंथामध्ये या अवताराचा संदर्भ आढळतो. या अवतारामध्ये पुष्टी ही भगवान विष्णुंच्या घरी त्याची मुलगी म्हणून जन्म घेते व श्री गणेश हे विनायक स्वरुपात शंकर-पार्वती यांच्या घरी जन्म घेतात. दुर्मती राक्षसाने पृथ्वी-पाताळ-स्वर्गलोक जिंकून सर्वत्र विध्वंस चालविलेला असतो. त्याचा नित्पात करण्याकरिता पार्वती मातेला दिलेल्या वरानुसार भगवान श्री गणेश विनायक अवतारामध्ये प्रगट होऊन दुर्मती राक्षसाचा वध करतात. त्यामुळे वैशाख शुद्ध पौर्णिमेचा दिवस हा पुष्टिपती विनायक जयंती म्हणून साजरा करतात.

वैशाख पौर्णिमेच्या पवित्र दिवशी श्री गणेशाचा पुष्टिपती विनायक हा अवतार झाला होता. भारतीय संस्कृतीमध्ये वैशाख पौर्णिमेला महत्त्वाचे स्थान आहे. उत्तर भारतामध्ये वैशाखी हा सण याच दिवशी विशेषत्वाने साजरा केला जातो. वैशाख वणव्यापासून देशवासियांचे रक्षण व्हावे. दुष्काळ, पाण्याचे दुर्भिक्ष शेतक-यांच्या समस्या गणरायाच्या कृपेने निर्विघ्न व्हाव्यात, या सद््भावनेने शहाळ्यांचा महानैवेद्य दरवर्षी अर्पण करण्यात येतो. तसेच, दुस-या दिवशी ससून रुग्णालयातील रुग्णांना शहाळ्यांचा प्रसाद देण्यात येणार आहे, असेही ट्रस्टतर्फे सांगण्यात आले.

Previous Post

अठरा वर्षांची तरुणी बेपत्ता

Next Post

व्यापाऱ्यांचे आतापर्यंत ७२ हजार कोटी रुपयांचे नुकसान

Related Posts

भोंदू बाबा मनोहर भोसलेमुळे अडकले शिक्षण संस्थापक, दोघांना अटक, झोळ पळाले…
मुख्य बातमी

भोंदू बाबा मनोहर भोसलेमुळे अडकले शिक्षण संस्थापक, दोघांना अटक, झोळ पळाले…

August 16, 2026
मुद्रांक बुडविल्याचे प्रकरण आले अंगलट.. पार्क स्टेडियम पुन्हा महापालिकेच्या ताब्यात…!
मुख्य बातमी

मुद्रांक बुडविल्याचे प्रकरण आले अंगलट.. पार्क स्टेडियम पुन्हा महापालिकेच्या ताब्यात…!

August 15, 2026
सोलापूर जिल्हा परिषदेत ८०वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा
मुख्य बातमी

सोलापूर जिल्हा परिषदेत ८०वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

August 15, 2026
‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने उत्साहात सायकल रॅली
मुख्य बातमी

‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने उत्साहात सायकल रॅली

August 14, 2026
पालकमंत्र्यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात मुख्य शासकीय ध्वजारोहण होणार
मुख्य बातमी

पालकमंत्र्यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात मुख्य शासकीय ध्वजारोहण होणार

August 14, 2026
मनोजकुमार यादव यांना राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर
मुख्य बातमी

मनोजकुमार यादव यांना राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर

August 14, 2026
Next Post
व्यापाऱ्यांचे आतापर्यंत ७२ हजार कोटी रुपयांचे नुकसान

व्यापाऱ्यांचे आतापर्यंत ७२ हजार कोटी रुपयांचे नुकसान

ताज्या बातम्या

भोंदू बाबा मनोहर भोसलेमुळे अडकले शिक्षण संस्थापक, दोघांना अटक, झोळ पळाले…

भोंदू बाबा मनोहर भोसलेमुळे अडकले शिक्षण संस्थापक, दोघांना अटक, झोळ पळाले…

August 16, 2026
जम्मू येथे देशसेवा बजावताना मंगळवेढ्याच्या जवानाला वीरमरण; वैभव आवताडे यांचे देशासाठी सर्वोच्च बलिदान

जम्मू येथे देशसेवा बजावताना मंगळवेढ्याच्या जवानाला वीरमरण; वैभव आवताडे यांचे देशासाठी सर्वोच्च बलिदान

August 16, 2026
‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत ‘हर घर पेड’ उपक्रमाला सोलापुरात उत्स्फूर्त प्रतिसाद

‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत ‘हर घर पेड’ उपक्रमाला सोलापुरात उत्स्फूर्त प्रतिसाद

August 15, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026