येस न्युज मराठी नेटवर्क ; शेतात मेंढरे हिंडवत असताना आम्हाला का नेले नाही ? असा जाब विचारत तातोबा शेंबडे व त्यांचा मुलगा बबलू शेंबडे यांनी मामा बजरंग धोंडीबा सरगर यांना काठीने मारहाण केली. बजरंग सरगर यांनी १८ मे रोजी याबाबत सलगर वस्ती पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. १५ मे रोजी बजरंग सरगर हे देगाव येथील विठ्ठल कलबुर्गी यांच्या शेतात मेंढरे हिंडवत असताना हा प्रकार झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलीस नाईक गायकवाड अधिक तपास करीत आहेत.