सोलापूर | काँग्रेसचे कार्यकर्ते करण म्हेत्रे यांच्या अंत्यविधीला काल सोलापुरात हजारोंची गर्दी होती. अंत्ययात्रेच्या वेळी काल महापालिका प्रशासन तसेच पोलीस खाते गप्प बसले . हजारोंची संख्या पाहून काल रात्रीपासून गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. काल अनेकांना धरपकड करून काही जणांना अटक देखील केली आहे . अंत्यविधी सुरुवात झाल्यावर काल जांबमुनी चौकात करण म्हेत्रे यांच्या घरासमोर जमा झालेल्या जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला तर त्यावेळी म्हेत्रे समर्थकांनी पोलिसांवर दगडफेक केली तसेच चप्पल फेकल्या. त्यामुळे दोनशे ते अडीचशे कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले. आज हा संपूर्ण एक किलोमीटर परिसर बॅरीगेटिंग लावून बंद करण्याची प्रक्रिया महापालिका आणि पोलीस प्रशासनाकडून सुरू केली जात आहे . त्यामुळे अंत्यविधीला पोलिसांनी विरोध केला नाही लष्कर सरस्वती चौक, ताशकंद चौक, जगदंबा चौक ,शास्त्रीनगर सिद्धार्थ चौक ,अलकुंटे चौक या परिसरात महापालिकेच्या वतीने 200 पत्रा शेड, 200 बांबू लावून एरिया सील केली जात आहे. अंत्यविधी निघण्यापूर्वीच महापालिका अधिकारी तसेच पोलीस खात्याच्या अधिकाऱ्यांनी अंत्यविधीला परवानगी नाकारली तसेच कार्यकर्त्यांची समजूत काढली असती तर आता एवढा उठाठेव करण्याची गरज नव्हती. हातावरचे पोट असणाऱ्या अनेक मजुरांना या भागात दररोज ये-जा करावी लागते. या प्रकरणामुळे कामगारांचे देखील मोठे हाल सुरू झाले आहेत याला जबाबदार कोण? हा प्रश्न उपस्थित झाला आहे











