येस न्युज मराठी नेटवर्क : वादळ येत आणि जात असतं. पण या चक्रीवादळापेक्षाही देशात निर्माण झालेलं कोरोना वादळ मोठं आहे. आधी ते थांबवा. त्यासाठी काम करा, अशा शब्दात शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारला डिवचले.
संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधताना कोरोनावरून पुन्हा एकदा केंद्र सरकारला डिवचले. चक्रीवादळ पेक्षाही या देशात जे कोरोनाचे वादळ निर्माण झालं आहे ते थांबवणं गरजेचं आहे. या कोरोनाच्या वादळाने रोज मृत्यूच्या राशी पडत आहेत. ते आधी थांबवलं पाहिजे. बाकीचे वादळ येतात आणि जातात. पण कोरोना वादळाचं काय करणार?, असा सवालही त्यांनी केला. यावेळी लसीकरणाच्या मुद्द्यावरही भाष्य केलं. लसीकरणा संदर्भात केंद्र आणि राज्य सरकारमध्ये चर्चा सुरू आहेत. लवकरच त्यातून मार्ग निघेल, असं राऊत म्हणाले.

