येस न्युज मराठी नेटवर्क ; जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात आज महात्मा बसवेश्वर जयंती साजरी करण्यात आली. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रशासन परमेश्वर राऊत, उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील, शिक्षणाधिकारी प्राथमिक संजय राठोड, शिक्षणाधिकारी माध्यमिक बाबर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्वच्छता व पाणीपुरवठा गोरख शेलार, कार्यकारी अभियंता बांधकाम पी.डी.कदम, पी.आर.माने, उपमुख्य लेखा व वित्त अधिकारी उत्तम सुर्वे, कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणीपुरवठा सुनील कटकधोंड, उपशिक्षणाधिकारी सुधा साळुंखे व जिल्हा परिषदेतील विविध विभागातील कर्मचारी उपस्थित होते.
सामाजिक समतेचा प्रभावशाली संदेश बाराव्या शतकात महात्मा बसवेश्वरांनी दिला आहे. “काय कवे कैलास” म्हणजेच कर्म हेच स्वर्ग ही संकल्पना बाराव्या शतकात महात्मा बसवेश्वरांनी मांडली. त्या संकल्पनेचे अनुकरण करण्याची आज गरज निर्माण झाली आहे. या संकल्पनेचा अंगीकार करुन जर आपण वागलो तर या सृष्टीचा स्वर्ग होण्यास वेळ लागणार नाही. असे विचार यावेळी सीईओ स्वामी यांनी मांडले. यावेळी उपशिक्षणाधिकारी सुधा साळुंखे यांनी त्यांच्या मातोश्री माजी मुख्याध्यापिका स्व.केशर मारुती साळुंखे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ कोविड रुग्णांसाठी ऑक्सिजन कॉंन्सट्रेटर आरोग्य विभागास भेट दिला. सदर ऑक्सिजन कॉंन्सट्रेटर मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्या हस्ते जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ शितलकुमार जाधव यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.यावेळी डॉ. अनिरुद्ध पिंपळे जिल्हा लसीकरण अधिकारी, मारुती साळुंखे, सतीश साळुंखे, अविनाश गोडसे आदी उपस्थित होते.
