येस न्युज मराठी नेटवर्क : श्री श्री रविशंकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत सोलापुरात बुधवारी १२ मे रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते . या शिबिरात आर्ट ऑफ लिव्हिंगच्या ८० साधकांनी रक्तदान केले. हे रक्त सिव्हील हॉस्पिटलच्या रक्तपेढीकडे सुपूर्द करण्यात आले. संस्थेचे भालचंद्र पगड्याल, डॉक्टर अंबादास गाजूल आणि लक्ष्मण भंडारी यांनी रक्तदान शिबिरासाठी परिश्रम घेतले.