येस न्युज मराठी नेटवर्क : होटगी रस्त्यावरील मोहिते नगर येथील श्रीशैल मल्लिकार्जुन कुंभार यांच्या सासऱ्यांच्या बंद घराचा दरवाजा उचकटून बेडरूममधील कपाटातील कपाटाचे ड्रायव्हर चावीने उघडून ८० हजार रुपयांचे दागिने व रोख रक्कम अज्ञात इसमाने चोरून नेली आहे. याबाबत श्रीशैल कुंभार यांनी विजापूर नाका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे . पोलीस हवालदार घुगे अधिक तपास करीत आहेत.