येस न्युज मराठी नेटवर्क : किशोर चव्हाण या पारधी कॅम्प येथील सेटलमेंट फ्री कॉलनीत राहणार्या व्यक्तीने सावकारांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याची फिर्याद पायल किशोर चव्हाण यांनी सलगर वस्ती पोलिस ठाण्यात केली आहे . 25 एप्रिल रोजी सुभद्रा मंगल कार्यालयाच्या पाठीमागे विहिरीत सापडलेले अज्ञात व्यक्तीचे मृतदेह आपल्या पतीचे असल्याचे पायल हिने ओळखले होते.23 फेब्रुवारी के 22 एप्रिल दरम्यान सेटलमेंट री कॉलनीतील राहते घर ते सुभद्रा मंगल कार्यालय या परिसरात आत्महत्या केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. पायल चव्हाण हिने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की , लोकडाऊनमुळे नोकरी गेल्यानंतर पती किशोर यांनी वेळोवेळी सावकारांकडून १० ते २५ टक्के व्याजदराने पैसे घेतले होते . परंतु हे पैसे परत न दिल्याने किरण चव्हाण, नर्मदा काळे , राजेश काळे, अनिकेत गायकवाड, महेश काळे असे पाच जण आपल्या पतीस त्रास देत होते या त्रासाला कंटाळूनच पतीने आत्महत्या केली असावी, असे पायल चव्हाण यांनी म्हटले आहे . सलगर वस्ती पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक वर्धन याप्रकरणी तपास करीत आहेत.