• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

चैत्रपाडव्याला भारद्वाजाचे दर्शन घेण्याची परंपरा ग्रामीण भागात अद्याप टिकून

Yes News Marathi by Yes News Marathi
April 12, 2021
in सिटीझन रिपोर्टर
0
चैत्रपाडव्याला भारद्वाजाचे दर्शन घेण्याची परंपरा ग्रामीण भागात अद्याप टिकून
0
SHARES
0
VIEWS

महाराष्ट्र व कर्नाटक राज्यांच्या सीमावर्ती भागातील शुभ शकुन पक्षी

सोलापूर – ( प्रतिनिधी ) – कुंभार कावळा, पाणकोंबडा, भाल्गुराम इत्यादी नावाने ओळख असलेल्या भारद्वाज पक्ष्याला शुभलक्षणी मानले जाते. या पक्ष्याचे दर्शन झाल्यास लोक पटकन हात जोडून वंदन करतात. हा पक्षी दिसला तर दिवस चांगला जातो अशी समजूत मानवीसमाजामध्ये आहे. इंग्रजीत या पक्ष्याला क्रो फिजंट असे नाव आहे.
चैत्र महिन्यातील गुढीपाडव्यादिवशी या पक्ष्याचे दर्शन घेण्यासाठी ग्रामीण भागातील मंडळी पहाटेच्यावेळी रानावनात पायपीट करताना दिसतात. सोलापूर जिल्ह्यातील भीमा व सीना नदीच्या तीरावरील महाराष्ट्र व कर्नाटक राज्यांच्या सीमेवरील खेड्यापाड्यात तसेच सांगली जिल्ह्याच्या जत तालुक्यातील पूर्व भागात लोक गुढीपाडव्यादिवशी या पक्ष्यांच्या शोधात बाहेर पडण्याची प्रथा अद्याप टिकून आहे. पूर्वीच्या हैदराबाद कर्नाटक राज्यांचा भाग असलेल्या लातूर व उस्मानाबाद जिल्ह्यातील कन्नड भाषा बोलणाऱ्या काही खेड्यापाड्यात तसेच उत्तर कर्नाटकाच्या सर्व जिल्ह्यांतील ग्रामीण भागात पाडव्यादिवशी भारद्वाजाचे दर्शन घेण्यासाठी आतुरलेले असतानाचे चित्र आजही पाहायला मिळते. भारद्वाजाचे दर्शन घेण्याची ही प्रथा वर्षानुवर्षे प्रचलित आहे.

कोकिळ कुळातील हा देखणा पक्षी जंगली कावळा एवढ्या आकाराचा असतो. चकाकणारी काळी कुळकुळीत पाठ, लांब, रुंद व जाड चोच, लालभडक डोळे व तांबूस रंगाचे पसरट पंख आणि लांब शेपटी असे वैशिष्ट्य असलेला हा पक्षी नेहमी रंगतदार वाटतो. झाडाझुडपांच्या गचपणीत विशेष करून नदी-नाल्यांच्या किनारी एकेकटा किंवा जोडीने हे पक्षी आढळतात. या पक्ष्याला एकटे राहणे व फिरणे आवडते. क्वाक्.. क्वाक्.. किंवा क्लच..क्लच.. असा मोठा भेसूर आवाज काढत इतर पक्ष्यांना आपल्या पासून दूर हाकलण्यात तो फार पटाईत आहे. या पक्ष्याचे उडणे अतिशय सावकाश व थोड्याच अंतराचे असते. बऱ्याच वेळा हा पक्षी धीम्या पावलांनी चालण्यात दंग असतो. शेतशिवारातील नाकतोडे,उंदीर, सरडे, प्रसंगी छोटे साप तसेच छोट्या गरीब पक्ष्यांची अंडी पिल्ले हे या पक्ष्यांचे प्रमुख खाद्य आहेत. श्वसन नलिकेच्या विकारावर नामी औषध या पक्ष्यांमध्ये असते या गैरसमजूतीने वैदू लोकांकडून या पक्ष्यांची शिकार केली जाते.

होला, तितर, लाव्हा, टिटवी, धाविक, दयाळ, साळुंकी यासारख्या छोट्या पक्ष्यांची घरटी उद्ध्वस्त करून त्यांच्या अंडीपिल्लांना पळविण्याच्या क्रूर वृत्तीचा हा पक्षी आहे. जनमानसात या पक्ष्याला शुभ का मानतात याचा उलगडा होईना झाला आहे. या पक्ष्याच्या अधिवासात झालेल्या मानवी अतिक्रमणामुळे हे पक्षी कमी होत चाललेले आहेत.
-डाॅ. अरविंद कुंभार, ज्येष्ठ पक्षी अभ्यासक.

Previous Post

महाराष्ट्र सरकारने कुठलाही त्रास दिला तर संघर्ष अटळ आहे – नितेश राणे

Next Post

दहावी-बारावीच्या परीक्षा पुढे ढकलल्या, ठाकरे सरकारचा निर्णय

Related Posts

‘या’ कारणांनी गाजला तानाजी सावंत यांचा सोलापूर दौरा…!
सडेतोड

‘या’ कारणांनी गाजला तानाजी सावंत यांचा सोलापूर दौरा…!

September 6, 2022
अखेर ‘ते’ वृत्त खोटे ठरले : थोबडेंनी केला काडादीचा भांडाफोड !
सडेतोड

अखेर ‘ते’ वृत्त खोटे ठरले : थोबडेंनी केला काडादीचा भांडाफोड !

August 26, 2022
आईने स्वतःच्याच मुलीला विकलं केवळ ८० हजार रुपयांत ? काय कारण वाचा
सिटीझन रिपोर्टर

आईने स्वतःच्याच मुलीला विकलं केवळ ८० हजार रुपयांत ? काय कारण वाचा

April 28, 2022
पुण्यात मांजरीचा खून, पोस्टमार्टमनंतर शेजारनीवर गुन्हा दाखल
सिटीझन रिपोर्टर

पुण्यात मांजरीचा खून, पोस्टमार्टमनंतर शेजारनीवर गुन्हा दाखल

April 9, 2022
तुमचा आत्मसन्मान तुमच्या आत्मप्रतिमेने ठरताे
सिटीझन रिपोर्टर

तुमचा आत्मसन्मान तुमच्या आत्मप्रतिमेने ठरताे

February 10, 2022
रस्त्यांसह इतर पायाभूत सुविधांचा दर्जा उंचावण्यावर भर द्यावा – विधानसभा उपाध्यक्ष नरहरी
सिटीझन रिपोर्टर

रस्त्यांसह इतर पायाभूत सुविधांचा दर्जा उंचावण्यावर भर द्यावा – विधानसभा उपाध्यक्ष नरहरी

February 9, 2022
Next Post
दहावी-बारावीच्या परीक्षा पुढे ढकलल्या, ठाकरे सरकारचा निर्णय

दहावी-बारावीच्या परीक्षा पुढे ढकलल्या, ठाकरे सरकारचा निर्णय

ताज्या बातम्या

‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने उत्साहात सायकल रॅली

‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने उत्साहात सायकल रॅली

August 14, 2026
मनपाच्या शाळा व सार्वजनिक मालमत्ता बीओटीवर देण्यास वंचित बहुजन आघाडीचा तीव्र विरोध

मनपाच्या शाळा व सार्वजनिक मालमत्ता बीओटीवर देण्यास वंचित बहुजन आघाडीचा तीव्र विरोध

August 14, 2026
पालकमंत्र्यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात मुख्य शासकीय ध्वजारोहण होणार

पालकमंत्र्यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात मुख्य शासकीय ध्वजारोहण होणार

August 14, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026